-
उमरेड-पवनी-कऱ्हाडला अभयारण्य म्हणजे ‘जय’ हा वाघ अशीच ओळख काही वर्षांपूर्वी होती, पण ‘चांदी’ तिथे आली आणि पर्यटक तिच्या रूपावर भाळले.
-
काहीश्या गोऱ्या आणि चकाकणाऱ्या चांदीने अल्पावधीतच जयचे मन जिंकले.
-
या दोघांचीही जोडी एकत्र अनेकदा पर्यटकांना दिसायची.
-
‘जय’ जेवढ्या निडरपणे लोकांना दिसायचा, तेवढाच बोल्डनेस ‘चांदी’ मध्ये होता.
-
तिची हीच अदा, रंग यामुळे तिला ‘चांदी’ हे नाव पडले.
-
‘जय’ बेपत्ता झाला तेव्हाच ‘चांदी’च्या बछदड्यापैकी तीन बेपत्ता झाले होते.
-
‘जयचंद’, ‘भद्रा’, ‘बली’ ही ‘जय’ आणि ‘चांदी’ची अपत्य आहेत.
-
‘जय’ गेल्यानंतर ‘चांदी’ने देखील उमरेड-पवनी-कऱ्हाडला अभयारण्य सोडले.
-
सध्या ती ब्रम्हपुरीच्या पर्यटन नसलेल्या क्षेत्रात आहे.
-
‘चांदी’ने वयाची दहा वर्षे कधीच पूर्ण केली आहेत, पण तिचा गोरा, रूबाबदार चेहरा, चकाकणारी त्वचा यामुळे तिचे ‘ चांदी’ हे नाव सार्थ ठरत आहे.
-
सर्व छायाचित्रे – श्रीकांत ढोबळे

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक