-
IAS अधिकारी टीना दाबी या सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. सध्या त्या राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्याच्या कलेक्टर म्हणून काम पाहत आहेत.
-
नुकतंच त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जैसलमेर येथील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये पावसाळ्यात खुललेलं जैसलमेरचं नैसर्गिक सौंदर्य पाहून टीना दाबींप्रमाणेच नेटकरीही आश्चर्यचकित झाले आहेत.
-
या फोटोला त्यांनी ‘हे वाळवंट आहे यावर कोणाचा विश्वास बसेल?’, असं कॅप्शन दिलं आहे.
-
त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एका युजरने, “कोणाचाही विश्वास बसणार नाही. कारण जैसलमेर जिल्ह्याला उत्तम कलेक्टर लाभली आहे” अशी कमेंट केली आहे.
-
तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने कमेंट करत “किती सुंदर फोटोग्राफी”, असं म्हटलं आहे.
-
गेल्या काही दिवसांत जैसलमेर जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे येथील वातावरण हिरवेगार झाले आहे.
-
राजस्थानमधील जैसलमेर हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या शहराला वैभवशाली परंपरा लाभली आहे.
-
किल्ले, हवेल्या, मंदिरांसाठी प्रसिद्ध असलेलं हे शहर ‘गोल्डन सिटी’ म्हणूनही ओळखलं जातं.
-
टीना दाबी यांनी शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
(सर्व फोटो : टीना दाबी/ इन्स्टाग्राम)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल