-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपत्तीत २०२१-२२ वर्षात एकूण २६.१३लाखांची वाढ झाली आहे.
-
पंतप्रधान कार्यालयाकडून याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
-
यानुसार, मोदींकडे कोणत्याही प्रकारची स्थावर मालमत्ता नाही.
-
२०२०-२१ वर्षात मोदींच्या नावावर गुजरातमधील गांधीनगर भागात १४ हजार १२५ चौ किमी बंगल्यातील एक चतुर्थांश भाग होता.
-
म्हणजे बंगल्यातील ३ हजार ५३१ चौ किमी जागेचे मोदी मालक होते.
-
परंतु, पंतप्रधान कार्यालयाकडून पुरविण्यात आलेल्या माहितीत स्थावर मालमत्तेपुढील कॉलममध्ये मोदींनी NIL असा उल्लेख केला आहे.
-
या मालमत्तेतील २५ टक्के मालकीचे शेअर पंतप्रधान मोदींनी दान केले आहेत.
-
याचे बाजारमूल्य सुमारे १.१०कोटी इतके आहे.
-
मोदींची एकूण संपत्तीत वाढ झाली असली तरी त्यांच्याकडे असलेली रोख रक्कम आणि बॅंक बॅलन्समध्ये घट झाली आहे.
-
३१ मार्च २०२१ पर्यंत मोदींकडे ३६ हजार ९०० रुपये इतकी रोख रक्कम होती.
-
त्यात घट होऊन मोदींकडे आता ३५ हजार ५२० रुपये आहेत.
-
मोदींच्या बॅंक खात्यात ३१ मार्च २०२१ पर्यंत एकूण १ लाख ५२ हजार ४८० रुपये होते.
-
यात १ लाख ५ हजार ९२५ रुपयांनी घट झाली आहे.
-
आता मोदींच्या बॅंक खात्यात फक्त ४६ हजार ५५५ रुपये आहेत.
-
पंतप्रधान मोदींच्या पोस्ट ऑफिस आणि एलआयसीमधील गुंतवणूकीत वाढ झाली आहे.
-
२०२०-२१ वर्षात मोदींनी पोस्टमध्ये ८ लाख ९३ हजार २५१ रुपयांची तर एलआयसीमध्ये १ लाख ५० हजार ९५७ रुपयांची गुंतवणूक केली होती.
-
मार्च २०२२ पर्यंत यात वाढ होऊन पोस्टमध्ये ९लाख ५ हजार १०५ रुपयांची गुंतवणूक आहे.
-
तर एलआयसीमध्ये १ लाख ८९ हजार ३०५ रुपयांची गुंतवणूक केली आहे.
-
याशिवाय मोदींकडे १ लाख ७३ हजार किंमतीचे सोन्याचे दागिने आहेत.
-
२०२०-२१ वर्षात मोदींची स्थावर मालमत्ता सोडल्यास एकूण संपत्ती १ कोटी ९७ लाख ६८ हजार ८८५ रपये इतकी होती.
-
२०२१-२२ वर्षात मोदींच्या संपत्तीत २६ लाखांची वाढ होऊन आता ते २ कोटी २३ लाख ८२ हजार ५०४ रुपये मालमत्तेचे मालक आहेत.
-
पंतप्रधान कार्यालयाकडून मोदींप्रमाणेच इतर १० केंद्रीय मंत्र्यांच्या मालमत्तेबाबत माहिती देण्यात आली आहे.
-
(सर्व फोटो : पंतप्रधान नरेंद्र मोदी/ फेसबुक)

Hanuman Jayanti 2025 : हनुमानाच्या ‘या’ आहेत चार प्रिय राशी; कमी वयात होतात श्रीमंत, संकटमोचनच्या कृपेने अडचणी होतात दूर