-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सात वेळा दिल्लीवारी आणि तब्बल ३९ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात १८ जणांचा समावेश करण्यात आला.
-
काँग्रेस, शिवसेना, पुन्हा काँग्रेस आणि आता भाजप असा प्रवास करत आलेले राधाकृष्ण विखे पाटील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदी विराजमान झाले.
-
राधाकृष्ण विखे पाटील यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे.
-
चंद्रकांत पाटील यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे.
-
पुण्याच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले चंद्रकांत पाटील यांना मंत्रीपद मिळाले आहे.
-
माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदी विराजमान झाले आहेत.
-
गिरीश महाजन यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे.
-
राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रीपद मिळाले आहे.
-
सुधीर मुनगंटीवार यांचे शिक्षण पदव्युत्तरपर्यंत झाले आहे.
-
शिवसैनिक गुलाबराव पाटील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदी विराजमान झाले आहेत.
-
गुलाबराव पाटील यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे.
-
उदय सामंत यांनी बारावीनंतर ऑटोमोबाइल क्षेत्रातील डिप्लोमा केला आहे.
-
शिवसैनिक उदय सामंत यांना मंत्रीपद मिळाले आहे.
-
दादा भुसे यांचे शिक्षण डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग झाले आहे.
-
माजी कृषीमंत्री दादा भुसे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे.
-
दीपक केसरकर यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटाची बाजू अतिशय प्रभावीपणे मांडणारे प्रवक्ते दीपक केसरकर यांना मंत्रीपद मिळाले आहे.
-
अब्दुल सत्तार यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे.
-
अब्दुल सत्तार यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले आहे.
-
शिंदे गटात गेलेल्या आमदारांपैकी विदर्भातील केवळ संजय राठोड यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली आहे.
-
संजय राठोड यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे.
-
राज्याच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या शिंदे गटातून शंभूराजे देसाई यांना कॅबिनेट मंत्रीपदाच्या बढतीसह सातारा जिल्ह्याच्या नेतृत्वाची संधी मिळाली आहे.
-
शंभूराजे देसाई यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे.
-
पक्षश्रेष्ठींसाठी उपयुक्त व विश्वास असलेले, मारवाडी, जैन, गुजराती समाजाचे प्रतिनिधित्व करणारे आणि देशातील बडे बांधकाम व्यावसायिक अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ भाजप नेते व मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे.
-
मंगलप्रभात लोढा यांचे शिक्षण एलएलबीपर्यंत झाले आहे.
-
राजकीय ‘कारस्थानां’मध्ये नेहमीच महत्त्वाची यशस्वी भूमिका बजावणारे डोंबिवलीतील भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
रवींद्र चव्हाण यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे.
-
ग्रामीण बेरकी राजकारणी असणारे संदीपान भुमरे यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदी मिळाले आहे.
-
संदीपान भुमरे यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे.
-
ग्रामीण बेरकी राजकारणी असणारे संदीपान भुमरे यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदी मिळाले आहे.
-
संदीपान भुमरे यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे.
-
नंदुरबारचे प्रतिनिधित्व करणारे डॉ. विजयकुमार गावित यांना तब्बल आठ वर्षांनंतर मंत्रीपदाची संधी मिळाली आहे.
-
आमदार विजयकुमार गावित हे डॉक्टर आहेत.
-
भाजपा आमदार सुरेश खाडे चार कोटींचे मालक आहेत.
-
शिवसैनिक तानाजी सावंत यांना मंत्रीपद मिळाले आहे.
-
तानाजी सावंत यांचे पदव्युत्तरपर्यंत शिक्षण झाले आहे.
-
मराठवाड्यातील भाजपचे एकमेव मंत्री म्हणून आमदार अतुल सावे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली.
-
अतुल सावे यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे.(सर्व फोटो सौजन्य : ट्विटर)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”