-
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मदनापूरची जुनाबाई आठ वर्षाची. चिमूर तालुक्यातील मदनापूर बफर क्षेत्रात ती जुनाबाई मंदिराच्या जवळ पर्यटकांना सर्वात पहिल्यांदा दिसून आली.
-
त्यानंतर तिला जुनाबाई म्हणूनच ओळखले जाऊ लागले आणि त्याच नावाने ती प्रसिद्ध झाली.
-
कंकझरी व मटकासूरसोबत ती कित्येकदा दिसून आली आणि त्यांच्यासोबतच अनेकदा तिची जोडी जमली.
-
तिच्या अधिवासात तिचेच राज्य असते.
-
त्यामुळे या क्षेत्रात ती कुणालाही फिरकू देत नाही.
-
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांमध्ये ती चांगलीच प्रसिद्ध आहे. तीचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत.
-
तिच्या अधिवासात एकदा ढाण्या वाघाने प्रवेश केला होता, त्यालाही तीने परतावून लावले.
-
बछड्यांच्या काळजीने तिने त्या वाघाशी दोन हात केले.
-
पर्यटन हंगामात ती सातत्याने पर्यटकांना दर्शन देते.
-
बछड्यांना निवांतपणे दूध पाजताना तर कधी त्यांच्यासोबत खेळताना दिसून येते.
-
जुनाबाई वाघीण जेवढ्या तिच्या पराक्रमांनी प्रसिद्ध आहे, तेवढेच तीच्या मायेची प्रचिती देखील पर्यटकांनी अनुभवली आहे.
-
छायाचित्रे – इंद्रजित मडावी (हेही पाहा : गोरी, रूबाबदार चेहरा अन् चकाकणारी त्वचा असलेली ‘चांदी’ वाघीण)

आता दु:खाचे दिवस संपणार! चैत्र पौर्णिमेच्या आधी ‘या’ राशींच्या दारी पैसा येईल चालून? रखडलेली कामे होऊ शकतात पूर्ण