-
भारताच्या गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि शेअर बाजाराचे ‘किंग’ म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांना मुंबईतील ब्रीच कँन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
-
सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
-
१९८५ साली राकेश झुनझुनवालायांनी कॉलेजमध्ये असल्यापासूनच शेअर ट्रेडींगला सुरुवात केली. त्यावेळेस बीएससीचा सेन्सेक्स केवळ १५० अंकांवर होता. पहिल्यांदा त्यांनी पाच हजारांची गुंतवणूक करत ट्रेडिंगला सुरुवात केली.
-
‘फोर्ब्स’च्या यादीनुसार सध्या राकेश झुनझुनवाला यांची संपत्ती ४३,७९६ कोटी (५.५ बिलियन डॉलर्स) आहे.
-
राकेश झुनझुनवाला यांनी सर्वात आधी टाटा टीसंदर्भात व्यक्त केलेला अंदाज बरोबर ठरला आणि १९८६ साली त्यांना पाच लाखांचा नफा झाला. त्यांनी ४३ रुपयांना टाटा टीचे पाच हजार शेअर्स विकत घेतले होते.
-
त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांमध्ये या शेअर्सची किंमत १४३ पर्यंत वाढली त्यामुळेच त्यांनी गुंतवणूक केलेल्या रक्कमेच्या तिपटीहून अधिक पैसा त्यांना मिळाला.
-
शेअर बाजारामध्ये बिग बुल म्हणजेच सर्वाधिक नफा कमावणाऱ्यांपैकी एक असणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांना हर्षद मेहताच्या कालावधीमध्ये मोठा नफा झाला होता.
-
१९९२ च्या शेअर बाजार घोटाळ्याचा त्यांना मोठा फटका बसलेला. एका मुलाखतीमध्ये राकेश झुनझुनवाला यांनीच आपण शॉर्ट सेलिंगच्या माध्यमातून भरपूर पैसा कमवल्याचं कबूल केलं होतं.
-
१९९० च्या दशकामध्ये भारतीय शेअर बाजारामध्ये कार्टेलच्या माध्यमातून सौदे केले जात. मनु माणेक असंच एका मोठ्या शेअर बाजार गुंतवणुकदाराचं नाव होतं जो ब्लॅक कोब्रा नावाने ओळखला जाई. याचबरोबर राधाकृष्ण दमानी (डी मार्टचे सर्वेसर्वा) आणि राकेश झुनझुनवाला यांच्या नावाचीही त्या काळात चर्चा होती. १९९२ साली पत्रकार सुचेता दलाल यांनी शेअर बाजारातील घोटाळा उघडीस आणला आणि शेअर बाजार कोसळला होता.
-
१९८७ मध्ये राकेश राधेशाम झुनझुनवाला यांनी रेखा झुनझुनवाला यांच्याशी लग्न केलं. अंधेरीत राहणाऱ्या रेखा या स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदार होत्या.
-
२००३ साली झुनझुनवाला यांनी त्यांची स्वत:ची स्टॉक ट्रेडींग फर्म रेअर एन्टरप्रायझेसची स्थापना केली. हे नाव त्यांनी पत्नीच्या आणि स्वत:च्या नावाच्या सुरुवातीच्या अक्षरांपासून ठेवलं आहे.
-
त्यांनी नुकतीच ‘अकासा’ ही एअरलाईन सुरू केली होती. घड्याळं आणि दागिने बनवणाऱ्या टायटन कंपनीमध्ये राकेश झुनझुनवाला यांचा सर्वाधिक म्हणजेच ११ हजार ८४९ कोटी रुपयांचा वाटा होता.
-
राकेश झुनझुनवाला हे बँकींग क्षेत्रासंदर्भातील जाणकार होते. सर्वसामान्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करून श्रीमंत होता येतं हे स्वप्न भारतीय गुंतवणूकदारांना दाखवणाऱ्या व्यक्तींपैकी एक म्हणजे झुनझुनवाला होते.
-
शेअर बाजार हा मोजक्या अतिश्रीमंतांसाठी नसून समाजातील सर्व स्तरांतील लोक भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करून श्रीमंत होऊ शकतात, हे झुनझुनवाला यांनी स्वत:च्या उदाहरणातून दाखवून दिलं.
-
यामुळेच मध्यमवर्गीयांचे राकेश झुनझुनवालांच्या टिप्पणीकडे, त्यांनी सुचवलेल्या शेअर्सकडे लक्ष असायचं. (File Photos)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही