-
पेंच व्याघ्रप्रकल्प जसा महाराष्ट्रात तसाच तो मध्यप्रदेशात देखील आहे.
-
लगतच ते असल्याने वाघ इकडून तिकडे जाणे नवे नाही.
-
मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्रप्रकल्पात ‘अभिव्यक्ती’ ही अशीच एक वाघीण.
-
एका हिवाळ्याच्या सकाळी आम्ही या तरुण वाघिणीला अतिशय मजेदार आणि खेळकर मूडमध्ये पर्यटक तिला भेटले.
-
कधी चालताना, कधी वेगवेगळी झाडांवर खुणा करताना आणि कधी सुगंधाची खूण करताना ती अगदी मॉडेल सारखे वेगवेगळे हावभाव पर्यटकांना देते.
-
तिने वन्यजीवप्रेमी व छायाचित्रकाराना दिलेल्या विविध हावभावामुळेच तिला ‘अभिव्यक्ती’ या नावाने ते ओळखतात.
-
तिच्या वेगवेगळ्या मुद्रा टिपण्यासाठी ते आतुर असतात.
-
जंगलात गायब होण्यापूर्वी तिने दिलेल्या सुंदर प्रतिसादामुळे पर्यटक ती पुन्हा कधी बाहेर येईल यासाठी तिच्या वाटेकडे डोळे लावून बसतात.
-
ती जणू काही जंगलात शिरताना तिचा सुगंध मागे सोडून जाते.
-
सर्व छायाचित्रे – विनीत अरोरा

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा