-
१८ ऑगस्ट रोजी भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४ वर्षे पूर्ण केली.
-
कोहलीने २००८ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
-
आपल्या १४ वर्षांच्या काळात विराट कोहलीने एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून अनेक विक्रम प्रस्थापित केले.
-
विराट कोहलीने डिसेंबर २०१७ मध्ये कर्णधार म्हणून सहावे कसोटी द्विशतक झळकावले.
-
अशी कामगिरी करणारा तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिलाच कर्णधार ठरला आहे.
-
विराट कोहली हा कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद चार हजार धावा करणारा फलंदाज आहे.
-
त्याने ६५ डावांमध्ये हा टप्पा गाठून ब्रायन लाराचा विक्रम मोडला होता.
-
एकदिवसीय सामन्यांत सर्वात जलद १० हजार धावा करण्याचा विक्रम कोहलीच्या नावे आहे.
-
त्याने फक्त २०५ डावांमध्ये ही कामगिरी केलेली आहे.
-
आयपीएलच्या एका मोसमात ९०० हून अधिक धावा करणारा विराट कोहली एकमेव फलंदाज आहे.
-
आयपीएल २०१६मध्ये त्याने १६ सामन्यांत ८१.८० च्या सरासरीने ९७३ धावा केल्या होत्या.
-
याशिवाय, एका कॅलेंडर वर्षात सर्वात जलद एक हजार धावा करण्याचा विक्रमही विराट कोहलीच्या नावे आहे. (सर्व फोटो सौजन्य – ट्विटर)

११ मार्च पंचांग: महादेवाच्या कृपेने मिथुन, कर्क राशीला विविध मार्गे होणार लाभ; तुमच्या आयुष्यात होणार का नवे बदल? वाचा राशिभविष्य