-
राजीव गांधी देशाचे सहावे पंतप्रधान होते. १९८४ ते १९८९ या काळात त्यांनी देशाचं पंतप्रधानपद भुषवलं. वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी ते देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले.
-
राजीव गांधी यांचा जन्म २० ऑगस्ट १९४४ रोजी मुंबईत झाला. इंग्लडमध्ये शिक्षण घेतल्यानंतर ते भारतात परतले. सरकारी मालकीच्या ‘इंडियन एअरलाईन्स’मध्ये त्यांनी पायलट म्हणून काम केलं.
-
(स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर देशाला संबोधित करताना राजीव गांधी) काँग्रेस नेते संजय गांधी यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर राजीव गांधींनी राजकारणात पाऊल ठेवलं.
-
(श्रीलंकेतील बौद्ध भिक्षू शिष्टमंडळाकडून राजीव गांधींना भगवान बुद्धाची प्रतिमा भेट) श्रीलंकेतील एलटीटीईच्या आत्मघाती हल्लेखोरांकडून २१ मे १९९१ रोजी राजीव गांधींची हत्या करण्यात आली.
-
मनुष्यबळ विकास मंत्रालयाची राजीव गांधी सरकारच्या काळात १९८५ मध्ये स्थापना करण्यात आली. उच्च शिक्षण आणि आधुनिकीकरणाच्या विस्तारासाठी या मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली.
-
राजीव गांधी हे आधुनिक युगातील नेते होते. विविध मतप्रवाहांचा ते आदर करायचे. शेतीसह विविध क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, हा त्यांचा आग्रह होता.
-
दिल्लीतील वीरभूमीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजीव गांधींना श्रद्धांजली अर्पण केली.
-
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींकडून राजीव गांधींना अभिवादन. राजीव गांधींना १९९१ रोजी भारत सरकारकडून देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला.
-
ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्याकडून वीरभूमीमध्ये राजीव गांधींना श्रद्धांजली
-
ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्याकडून राजीव गांधींनी श्रद्धांजली अर्पण
-
दिल्लीच्या वीरभूमीतील श्रद्धांजली कार्यक्रमात राहुल गांधी, प्रियांका गांधी-वाड्रा, रॉबर्ट वार्डा आणि मल्लिकार्जून खर्गे उपस्थित होते.
Aligarh Love Story: पळून गेलेले सासू-जावई दहा दिवसांनी परतले घरी, सासू आता म्हणते…