-
देशातील अनेक महिला IAS अधिकारी आपल्या टॅलेंटसोबत सौंदर्यामुळेही चर्चेत आहेत.
-
अजमेर येथील रहिवासी असणाऱ्या परी बिश्नोई यांनी २०१९ मध्ये UPSC परीक्षेत यश संपादन केलं होतं. या परीक्षेत त्यांनी देशात ३० वा क्रमांक पटकावला होता.
-
राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ऐश्वर्या श्योरनने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. आयएएस होण्यासाठी त्यांनी मॉडेलिंग करिअरला रामराम ठोकला होता.
-
ऐश्वर्याने २०१४ मध्ये ‘क्लीन अँड क्लियर फेस फ्रेश’ आणि २०१६ मध्ये ‘फेमिना मिस इंडिया’च्या अंतिम फेरीत धडक मारली होती. (फोटो- मीस इंडिया)
-
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सृष्टी देशमुख यांनी २०१९ मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली होती.
-
सृष्टी देशमुखने यूपीएससी परीक्षेत देशात पाचवा क्रमांक पटकावला होता.
-
तनु जैन यांनी २०१४ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. २०१५ मध्ये त्यांची सशस्त्र सेना मुख्यालयात नियुक्ती करण्यात आली होती. डॉ. तनु जैन यांनी बीडीएसचे शिक्षण घेतलं असून त्यांचा जन्म दिल्लीत झाला होता.
-
रिया डाबी ही आयएएस अधिकारी टीना डाबी यांची धाकटी बहीण आहे. २०२० च्या UPSC परीक्षेत रियाने देशात १५ वा क्रमांक मिळवला होता. त्या सोशल मीडियावरदेखील खूप सक्रीय असतात.
-
स्मिता सभरवाल ह्या सुरुवातीपासून अभ्यासात हुशार होत्या. बोर्डाच्या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. २००० साली त्यांनी UPSC परीक्षेत चौथा क्रमांक मिळवला होता. (सर्व फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”