-
-
उद्योगपती मुकेश अंबानी हे देशातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत.
-
ते त्यांच्या लग्झरी लाइफस्टाइलसाठी ओळखले जातात.
-
ते त्यांच्या लग्झरी लाइफस्टाइलसाठी ओळखले जातात.
-
त्यांच्याजवळ रिलायन्स जिओ ही सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे.
-
मुकेश अंबानी यांच्या पत्नी निता अंबानी यादेखील अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांच्यासमवेत पाहायला मिळतात.
-
त्यांना मुलगी इशा आणि आकाश व अनंत नावाची मुलं आहेत
-
आकाश अंबानीचे श्लोका मेहताशी लग्न झाले असून त्यांना पृथ्वी नावाच मुलगा आहे.
-
ऐशोआरामात जीवन जगणाऱ्या मुकेश अंबानी यांनी प्रॉपर्टी फक्त देशातच नाही, तर परदेशातही आहे.
-
त्यांच्याजवळ अँटिलिया नावाचं घर, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स नावाची टीम आणि अनेक महागडी हॉटेल्स आहेत.आज आपण त्यांच्या पाच महागड्या प्रॉपर्टीबद्दल जाणून घेणार आहोत.
-
जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात महाग मालमत्ता म्हणजे मुकेश अंबानी यांचा आलिशान बंगला ‘अँटिलिया’. अहवालानुसार या 27 मजली इमारतीची किंमत 12 हजार कोटी रुपये आहे. दक्षिण मुंबईतील अल्टामाऊंट रोडवर 4 लाख स्क्वेअर फूटमध्ये अँटिलिया बंगला बांधण्यात आला आहे. यामध्ये पार्किंग लॉट, सिनेमा हॉल, बाग, स्पा मंदिर, योगा स्टुडिओ, तीन स्विमिंग पूल आणि हेलिपॅडसह अनेक सुविधा आहेत.
-
मुकेश अंबानी यांनी २०२१ मध्ये ब्रिटनचा प्रसिद्ध कंट्री क्लब आणि लक्झरी गोल्फ रिसॉर्ट ‘स्टोक पार्क’ विकत घेतला. सुमारे ३००एकरांवर बांधलेले हे स्टोक पार्क बकिंगहॅमशायर येथे आहे.
-
अंबानी यांनी न्यूयॉर्कमधील मँडरिन ओरिएंटल हॉटेल खरेदी केले. अहवालानुसार, रिलायन्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्सने हॉटेलचे ७३% शेअर्स त्यांनी सुमारे ७३० कोटी रुपयांमध्ये विकत घेतले. न्यूयॉर्कमधील सर्वात महागडे ठिकाण असलेल्या मॅनहॅटनमध्ये हे ४६ मजली हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये २०२ रुम्स आहेत.
-
मुकेश अंबानी आयपीएल टीम ‘मुंबई इंडियन्स’ चे मालक आहेत. मुकेश अंबानी यांनी २००८ मध्ये ही टीम खरेदी केली होती. रिपोर्टनुसार, मुकेश अंबानींनी ही टीम सुमारे ७५० कोटी रुपयांना खरेदी केली होती. या संघाने आतापर्यंत पाच वेळा आयपीएलचं विजेतेपद जिंकलं आहेत. आता या टीमची किंमत सुमारे १० हजार कोटी आहे.
-
मुकेश अंबानी यांनी २०१९मध्ये ब्रिटिश खेळणी बनवणारी कंपनी ‘हॅम्लेज’ विकत घेतली. हॅम्लेज ही जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी खेळणी बनवणारी कंपनी आहे. रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानी यांनी ही कंपनी ६२० कोटींना खरेदी केली आहे होती. या कंपनीचे जगभरात ११५ पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत.
‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई