-
फक्त गेट उघडायला उशीर झाला म्हणून महिलेने सिक्यूरिटी गार्डला बेदम मारहाण आणि शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय.
-
ही महिला बिहारच्या सुरक्षा रक्षकांनाही अपमानास्पद भाषेत उच्चारताना दिसत आहेत. काही वेळाने अपशब्द वापरताना आणि गार्डची कॉलर वारंवार पकडताना ही महिला दिसून येते.
-
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर महिलेच्या गैरवर्तणुकीवर नेटकरी संतापले असून तिच्यावर कारवाईची मागणी करू लागले. त्यानंतर महिलेवर कारवाई करत तिला न्यायालयात हजर केले. यात तिला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले.
-
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता सर्वांना जाणून घ्यायचे आहे की नक्की ही महिला आहे तरी कोण? तर जाणून घेऊया तिच्याबद्दल काही गोष्टी…
-
नोएडाच्या महिलेचं नाव आहे भव्या रॉय असं आहे.
-
ती व्यवसायाने वकील आहे.
-
नोएडा १२८ मध्ये जेपी विशटाउन सोसायटीमध्ये ती राहत असून याच सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ आणि मारहाण केली.
-
भव्या रॉय दक्षिण दिल्लीच्या साकेत कोर्टात वकील आहे आणि तिथे प्रॅक्टिस करते.
-
आपण विवाहित असल्याचे महिलेने चौकशीत सांगितले आहे.
-
भव्या रॉयचे २०१६ मध्ये लग्न झाले. भव्या रॉय हिच्या पतीचे नाव कौस्तुभ चौधरी आहे.
-
भव्या मूळची दिल्लीतील मेहरौली येथील आहे.
-
भव्या तीन महिन्यांपूर्वी नोएडा १२८ मधल्या जेपी विशटाउन येथे भाड्याच्या घरात राहायला आली होती.
-
भव्या देशातील एका टॉप लॉ फर्म्सपैकी एक असलेल्या डीएसके लीगल या फर्ममध्ये एक महिन्यापूर्वीच सामील झाली.
-
घटनेच्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या एका रक्षकाने सांगितले की, आरोपी महिलेचे वर्तन अत्यंत वाईट आहे.
-
तिने यापूर्वीही सोसायटीत राहणाऱ्या अनेक लोकांसोबत अश्लील कृत्य केले आहे.
-
तिने यापूर्वी सुद्धा त्याच्या इतर अनेक साथीदारांना देखील शिवीगाळ केली आहे, असं देखील पिडीत सुरक्षा रक्षकाने सांगितलं आहे.
-
तिला कोणी विरोध केला तर ती आपल्या वकिलीचा बडगा उगारायला लागते, असं देखील सांगण्यात येत आहे.
-
२० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५-६ वाजण्याच्या सुमारास ती तिची गाडी सोसायटीच्या बाहेर काढत होती. सोसायटीतून बाहेर पडताना गार्ड गाडीचा नंबर लिहीत असताना त्याला काही वेळ उशीर झाला, कारण तिथे दुसरी गाडीही होती.
-
यावरून भव्याला राग आला आणि तिने तिथल्या सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ सुरू लागली. भव्या त्यावेळी दारूच्या नशेत होती.
-
या व्हायरल व्हिडीओमध्ये महिला तिच्या प्रत्येक वाक्यात अश्लील अपशब्द वापरताना दिसत आहे. इतकंच काय तर तिने सुरक्षा रक्षकाची कॉलर सुद्धा पकडली.
-
एका गार्डचा गणवेशही ओढताना दिसत आहे. तर त्याला मारहाण सुद्धा तिने केलीय.
-
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आयपीसी कलम 153-ए (पूजेच्या ठिकाणी केलेला गुन्हा), आयपीसी कलम 323 (कोणत्याही व्यक्तीला स्वेच्छेने दुखापत करणे), आयपीसी कलम 504 (कोणत्याही व्यक्तीला भडकावण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान), ५०५(२) (विविध समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे), आयपीसीचे कलम ५०६ (एखाद्याला धमकावणे). आयपीसी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
त्यानंतर न्यायालयाने महिलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
-
त्याचबरोबर सोशल मीडियावर लोकांकडून याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
-
त्यानंतर तिला पोलीस घेऊन जातानाचा आणखी नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. All Photos : Twitter)
-
सोशल मीडियावर तिच्या अटकेचा व्हिडीओ व्हायरल करून नेटकरी मंडळी आपली वेगवेगळी मतं व्यक्त करताना दिसत आहेत.

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल