-
सोनाली फोगट यांचे निधन झाले आहे. ती एक भाजप नेता होती. तसंच तिने टिकटॉकवरील व्हिडीओंद्वारे लोकप्रियता मिळवली होती.
-
तिने बिग बॉस १४ मध्ये वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली आणि ३४ दिवस ती बिग बॉसच्या घरात राहिली होती. सोनाली ४३ वर्षांची होती आणि गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने तिचे निधन झाले.
-
सिद्धार्थ शुक्ला आता आपल्यात नाहीत यावर आजही विश्वास ठेवणे कठीण आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला असून त्यांचे चाहते अद्याप या दुःखद बातमीतून सावरलेले नाहीत.
-
प्रत्युषा बॅनर्जीने ‘बालिका वधू’मध्ये मुख्य भूमिका साकारून चर्चेत आली होती. तिने बिग बॉस सीझन ७ मध्ये भाग घेतला होता, परंतु ६३व्या दिवशी ती शोमधून बाहेर पडली. २०१६ मध्ये, वयाच्या २४ व्या वर्षी, या अभिनेत्रीने आत्महत्या केली.
-
‘बिग ब्रदर’ ५ मध्ये भाग घेतल्यानंतर, जेड गुडी ‘बिग बॉस’ सीझन २ मध्ये स्पर्धक म्हणून दिसली. पण, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाल्याचे निदान झाल्याने अवघ्या पाच दिवसांत त्यांना घर सोडावे लागले. २००९ मध्ये वयाच्या २७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
-
‘बिग बॉस’च्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त सेलिब्रिटींपैकी एक होता स्वामी ओम. गेल्या वर्षी वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
.