-
आशिया चषक २०२२ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा बहुप्रतीक्षित सामना २८ ऑगस्टला पार पडणार आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये हा सामना आयोजित करण्यात आला आहे
-
आशिया चषक मालिकेत आजवर भारत पाकिस्तान संघ आजवर १४ वेळा आमनेसामने आले आहेत.
-
आशिया चषक सामन्यांमध्ये आठ वेळा टीम इंडियाने तर ५ वेळा पाकिस्तानाने विजय प्राप्त केला होता.
-
भारत- पाकिस्तानच्या आजवरच्या सामन्यांमध्ये २०१२, २०१६, २०१८ साली झालेले सामने बहुचर्चित ठरले होते.
-
आशिया चषक २०१२ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना मीरपूर मध्ये पार पडला होता.
-
२०१२ ला पाकिस्तानने जोरदार फलंदाजी करून ३२९ धावांची खेळी खेळली होती. पाकिस्तानचे मोहम्मद हफीज व नासिर जमशेद यांनी शंभर तर युनिस खानने सुद्धा अर्धशतक पूर्ण केले होते.
-
२०१२ च्या सामन्यात टीम इंडियाची सुरुवात मात्र कमजोर होती. गौतम गंभीर फार लवकर आउट झाल्यावर सचिन तेंडुलकर व कोहलीने खेळ सांभाळला होता.
-
२०१२ ला विराट कोहलीने १८३ धावा, रोहित शर्माने ६८ तर मास्टर ब्लास्टरने ५१ धावांसह अवघ्या ४७ ओव्हरमध्ये पाकिस्तानला धूळ चारली होती
-
आशिया चषक २०१६ मधील भारत पाकिस्तानचा सामना सुद्धा अटीतटीचा ठरला होता.
-
खरंतर पाकिस्तानची संपूर्ण फलंदाजांची फळी अवघ्या ८३ धावांमध्ये माघारी आली होती.
-
मात्र त्याउलट दमदार गोलंदाजी पाकिस्तानने करत हे छोटं आव्हान पूर्ण करताना टीम इंडियाची दाणादाण उडवली होती.
-
रोहित धर्मा व अजिंक्य रहाणे शून्यावर बाद झाल्यावर विराट व युवराज सिंहने खेळी सांभाळून अनुक्रमे ४९ व १४ धावा केल्या होत्या.
-
अखेरीस पाच गडी राखून १५ ओव्हरमध्ये टीम इंडियाने टार्गेट पूर्ण केले होते, व या सामन्यात सोपा पण तितकाच अवघड विजय मिळवला होता.
-
आशिया चषक २०१८ मध्ये भारत- पाकिस्तानचा शेवटचा सामना पाहायला मिळाला होता. यावेळी रोहित शर्माने भारताचे नेतृत्व केले होते.
-
२०१८ मध्ये फलंदाजीच्या बाबत पाकिस्तानची परिस्थिती अगदीच दयनीय होती. ४३ ओव्हर मध्ये अवघ्या १६२ धावा पूर्ण करून टीम बाद झाली होती
-
रोहित शर्माच्या ५२ धावा, शिखर धवनच्या ४६ धावा, व भुवनेश्वर किमान आणि केदार जाधवने घेतलेल्या तीन विकेटसह टीम इंडियाने हा ५० षटकांचा सामना अवघ्या २९ ओव्हरमध्ये संपवून विजय प्राप्त केला होता.
-
यंदा २०२२ मध्ये टीम इंडियाचे नेतृत्त्व रोहित शर्मा करणार आहे तर उपकर्णधार पदाची जबाबदारी के. एल. राहुलवर सोपवण्यात आली आहे.
-
भारतीय संघात यंदा रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या, व माजी कर्णधार विराट कोहली अशी फलंदाजांची मजबूत टीम निवडण्यात आली आहे.
(सर्व फोटो: प्रातिनिधिक/ संग्रहित)