-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या राजकीय भूमिकेबरोबर भाषणं आणि त्यामधील वक्तव्यांसाठी ओळखले जातात.
-
काही दिवसांपूर्वीच त्यांनी शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी मुंबईमधील मेळाव्यात संवाद साधला.
-
यावेळी दोन ते अडीच महिन्यांनी कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर आपल्या शस्त्रक्रीयेबद्दल बोलताना राज यांनी खास त्यांच्या शैलीत तुफान शाब्दिक फटकेबाजी केली.
-
हिप रिप्लेसमेंट सर्जरीवरुन राज यांनी केलेल्या विधानांमुळे सभागृहात एकच हशा पिकल्याचं पहायला मिळालं.
-
यामध्ये राज यांनी अगदी डॉक्टर्सपासून ते त्यांना भेटायला येणाऱ्यांपर्यंत सर्वांचेच किस्से सांगितले.
-
“आज २३ तारीख. २० तारखेला माझ्यावर झालेल्या शस्त्रक्रीयेला दोन महिने पूर्ण झाले. म्हणून मी आल्या आल्या महाराजांच्या पुतळ्याजवळ गेलो, दर्शन घेतलं. तुम्हाला मी खरं तर व्यवस्थित चालतोय हे पण दाखवलं,” असं राज यांनी म्हणताच सर्वजण हसू लागले.
-
“भयानक असते ती शस्त्रक्रिया, खरं तर कुठलीही शस्त्रक्रिया. खरं तर त्यांनी छोटा कट देऊन हाडामध्ये काहीतरी इंजेक्ट करतात की पंक्चर करतात. मग ब्लड फ्लो सुरु होतो वगैरे. ते बरोबर केलं होतं,” अशी माहिती दिली.
-
“त्यानंतर माझा पाय दुखायचा बंद झाला. सगळं व्यवस्थित सुरु होतं. बरोबर वर्षभरानंतर परत मला दुखायला लागलं. चालायला त्रास होऊ लागला,” असंही राज म्हणाले.
-
“मी डॉक्टरांना यासंदर्भात विचारलं. डॉक्टर म्हणाले, मला तर वाटलं सगळं व्यवस्थित झालं होतं. आली तर पहिल्या चार-पाच महिन्यात अडचण येते. वर्षभराने अशी अडचण येत नाही,” असं राज यांनी डॉक्टरांसोबतच्या चर्चेबद्दल सांगितलं.
-
“त्यांनी मला विचारलं कोव्हीड झाला होता का? मी हो म्हटल्यावर त्यांनी यामुळेच असं झाल्याचं म्हटलं,” अशी माहितीही राज यांनी दिली.
-
“जगभरामध्ये करोनानंतर हाडांसंदर्भातील समस्या अनेकांना होऊ लगल्या आहेत. तशीच अडचण मला आली,” असं राज यांनी सांगितलं.
-
पुढे राज यांनी आपल्याकडे या शस्त्रक्रीयेसंदर्भात चौकशी झाल्याची माहिती दिली. राज म्हणाले, “मी शस्त्रक्रिया करुन आलो होतो. त्यानंतर हे परत झालं. या दरम्यान एकाने मला विचारलं, कसलं ऑप्रेशन? मी म्हटलं, हिप रिप्लेसमेंट”
-
राज यांनी हिप रिप्लेसमेंटचं नाव घेताना हाताने केलेला इशारा पाहून सभागृहातील अनेकजण हसू लागले.
-
“मला तो म्हणाला, हिप रिप्लेसमेंट? कशामुळे? जवळच्यांनी आणि बाहेरच्यांनी इतकी वर्ष जी माझी लावली ना…” असं राज यांनी म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ माजला. अनेकांनी टाळ्या वाजवल्या, शिट्ट्याही मारल्या. तसेच राज यांच्या नावाने घोषणाबाजी केली.
-
“बदलायचीच वेळ आली,” असं राज यांनी हिप रिप्लेसमेंटसंदर्भात हसत म्हटलं.
-
त्यानंतर डोक्याला हात लावत राज यांनी, “एक-एक काय काय लोक येतात हो,” असं म्हटलं.
-
“हार्ट रिप्लेसमेंट, किडनी रिप्लेसमेंट असते वगैरे सारख्या गोष्टी. एकाने मला विचारलं, अच्छा हिप रिप्लेसमेंट म्हणजे दुसरी लावणार?” असं पुढे राज यांनी म्हणताच मंचावरील सर्व मान्यवरांसहीत पदाधिकारी हसू लगाले.
-
राज यांनी लगेच, “मी म्हटलं कसं दिसेल ते” असं म्हणताच सर्वजण अजून जोरात रहू लगाले.
-
“बरं त्यात माझी शस्त्रक्रिया म्हटल्यावर कोण काढून देईल?” असा मिश्किल सवाल राज यांनी विचारल्यावर पुन्हा सर्वजण हसू लागले.
-
“साहेब बरं दिसत नाही माझी घ्या”, असंही राज यांनी हातवारे करत म्हटल्यानंतर अगदी खोकला येईपर्यंत उपस्थित पदाधिकारी हसत होते.
-
काय काय प्रश्न विचारतात भेटायला येणारे असं म्हणत पुढे राज यांनी त्यांच्या डॉक्टरांचाही किस्सा पदाधिकाऱ्यांना सांगितला.
-
पत्रकारांनी या डॉक्टरांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी दिलेल्या उत्तरासंदर्भात बोलताना राज यांनी पत्रकारांनाही टोला लगावला. “हे कुठेही जातात. मेलेल्याच्या घरीही जातात आणि विचारतात काय वाटतंय? अरे काय वाटतंय काय?” असं म्हणत राज यांनी खोचक टोला लगावला.
-
राज किस्सा सांगताना म्हणाले, “पहिल्या शस्त्रक्रीयेच्या वेळेस ते डॉक्टर शस्त्रक्रीयेनंतर बाहेर आले. ते एक वरिष्ठ डॉक्टर होते. माझ्यावर ज्यांनी शस्त्रक्रिया केली ते नाही दुसरे. ते बाहेर आले तर त्यांना पत्रकारांनी विचारलं, काय झालं?”
-
“मी मोबाईलवर हे ऐकत होतो. तसं काय झालं राजसाहेब टेनिस खेळायला गेले होते आणि ते त्यांच्या ढुंगणावर आपटले,” असं त्या डॉक्टरांनी म्हटल्याचं राज यांनी भाषणात सांगितलं.
-
डॉक्टरांनी केलेलं हे विधान ऐकून सारेच उपस्थित मोठ्याने हसू लागले. “मी म्हटलं काय अरे डॉक्टर आहात ना तुम्ही” असंही राज यांनी बारीक तोंड करत सांगितलं.
-
“मी शस्त्रक्रीयेसाठी जेव्हा गेलो तेव्हा त्यांना भेटलो. त्यावेळी त्यांना म्हटलं, मागच्या वेळेसारखं तुम्ही काही बोलू नका. त्यावर ते मला म्हणाले, साहेब मागच्या वेळेला मला खरं तर गां*वर पडले सांगायचं होतं. मी ढुंगणावर पडले सांगितलं,” असं राज यांनी भेटीचा किस्सा सांगताना म्हटलं.
-
राज यांचं हे विधान ऐकून सारेच हसत असताना राज यांनी डॉक्टरांना दिलेल्या सल्ल्यासंदर्भात सांगितलं. “ते ऐकून मी म्हटलं नाही तुम्ही म्हटलं ते ढुंगणावरती ठेवा. पुढचं बोलू नका,” असं राज म्हणाले.
-
“मी म्हटलं अरे तुम्ही डॉक्टर आहात ना. तुमच्या भाषेत त्याला हिप वगैरे काहीतरी म्हणतात ना. ते बोल ना?,” असा प्रश्न विचारल्याचं राज म्हणाले.
-
“लगेच आपली काढायला कशाला पाहिजे,” असा टोला राज यांनी हातवारे करत लगावला आणि सारे पुन्हा जोरात हसू लागले.
-
राज यांनी आता आपली प्रकृती अगदी उत्तम असल्याचंही हा किस्सा सांगून झाल्यानंतर म्हटलं.

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी