-
सोशल मीडियावर आपल्या बॉलिवूड गाण्यांच्या व विविध पदार्थांच्या मजेशीर Puns पोस्ट बनवून हिट झालेल्या मराठमोळ्या तरुणीशी लोकसत्ताने मारलेल्या गप्पा..
-
ऍना पाटणकर ही मूळची साताऱ्याची आहे.
-
अभिनव कला महाविद्यालय, पुणे येथे तिने अप्लाइड आर्ट मधून शिक्षण पूर्ण केले
-
ऍनाने पूर्णवेळ फ्रीलान्स इल्युस्ट्रेटर होण्याआधी पुण्यात काही वर्ष काम केले.
-
सध्या ती चिली, दक्षिण अमेरिकेत मध्ये राहून जगभरातील ग्राहकांसाठी कॅरेक्टर डिझाईन करते.
-
लहान मुलांसाठी कॉमिक बुक डिझाईन करण्याचे काम ऍना प्रामुख्याने करते.
-
तिने नोव्हेंबर मध्ये २०२१ पासून फूड इल्युस्ट्रेशन पोस्टची सुरुवात केली होती.
-
कांदा लसूण मसाला, वडा पाव, डोसा युनिवर्स या तिच्या सुरुवातीच्या पोस्टला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला.
-
डोसा युनिवर्सला १.८० लाख लाईक्स, जवळजवळ १००० कमेंट्स होते.
-
काही व्हायरल पोस्टमुळे तिचे फॉलोवर्स झपाट्याने वाढले. सध्या ऍनाचे ८५ हजाराहून अधिक फॉलोवर्स आहेत. आपणही @anapatankardraws या इंस्टाग्राम अकाउंट वर तिला फॉलो करू शकता.
-
सुरुवातीला तिने बॉलिवूड मूव्ही आणि गाण्यांचा शब्दखेळ तिने अनेक पोस्ट बनवल्या.
-
हळूहळू ती या ऍनिमेशनच्या रील्स व व्हिडीओ बनवू लागली
-
माझ्या व्हिज्युअल आर्ट पोस्टमुळे मला मनाप्रमाणे माझी कला जोपासता येते, मी माझा वेगळा कला प्रकार जपत असल्याने मला खूप मुक्त आणि आनंदी वाटतं.
-
व्यावसायिकदृष्ट्या, इल्युस्ट्रेशनमुळे मला इन्फ्ल्यूएंसर म्हणून ओळख मिळाली आहे. आतापर्यंत अनेकांनी कोलॅब्रेशनसाठी चौकशी केली, भविष्यात काही आकर्षक ऑफर असल्यास विचार करेन असे ऍनाने सांगितले.
-
माझा स्वभाव खवय्या आहे आणि बॉलिवूड फॅन आहे. माझा स्वभाव कल्पक आहे, आणि आजूबाजूला इतक्या गोष्टी घडत असताना त्यांच्या निरीक्षणातून विविध पोस्ट सुचतात.
-
ऍना सांगते की, भारताबाहेर राहायला लागल्यापासून भारतीय खाद्यपदार्थांची आवड आणि तळमळ दहा पटीने वाढली.
-
भारत सोडल्यानंतर यूट्यूबवर तिने भारतीय रेसीपीचे व्हिडिओ पाहण्यास सुरुवात केली.
-
बॉलीवूड म्युझिक व चित्रपटांची आवड होतीच पण देश मागे सोडून आल्यापासून जास्त आठवणी येऊ लागल्या
-
१९५० आणि ६०च्या दशकातील गाण्यांपासून ते नवीन रॉक गाण्यांपर्यंत सगळं काही ऐकायला आवडत असल्याचे ऍना सांगते. अगदी कुमार गंधर्व यांचं शास्त्रीय संगीत आमच्या घरी नेहमी ऐकू यायचं, म्हणूनच गाण्याची आवड निर्माण झाली.
-
ऍना म्हणते, मला फारशा अडचणी आल्या नाहीत. माझे आयुष्य खूप आनंदी गेले आहे आणि माझ्या कामातून सुद्धा तेच दिसून येते.
-
माझ्या आयुष्याचा खा, हसा आणि हेल्दी रहा हा एकमेव हेतू आहे, असे ऍना सांगते. (सर्व फोटो सौजन्य: Instagram/@anapatankardraws)

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी