-
इच्छा असेल तर मार्ग सापडतो, असं म्हटलं जातं. ज्यातून अगदी लहान वयात मोठी स्वप्नंही साकार केली जाऊ शकतात.
-
१७ वर्षीय मॅक रुदरफोर्डने असेच काहीसं केले आहे, ज्याची आज जगभरात चर्चा होत आहे.
-
मॅकने विमान घेऊन तब्बल ५२ देशांचा प्रवास केला आहे.
-
त्याने केलेल्या या कामगिरीमुळे रुदरफोर्डचं नाव आता गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलं आहे.
-
ज्या वयात मुलं मजा-मस्ती करतात त्या वयात मॅक रुदरफोर्डने आकाशात उडण्याचं स्वप्न पाहिले.
-
त्याला २०२० साली पायलटचा परवाना मिळाला. यानंतर केवळ दोन वर्षात त्याने जगभरात उड्डाण करून सर्वात तरुण वैमानिक होण्याचा मान मिळवला आहे.
-
बेल्जियम-ब्रिटिश वैमानिक मॅक रुदरफोर्डने यावर्षी २३ मार्च रोजी बल्गेरियातील सोफिया येथून उड्डाण केले.
-
५२ देशांवरून सुमारे २५० तास उड्डाण केल्यानंतर, तो पुन्हा सोफियात परत आला.
-
त्याच्या या मोहिमेला आयसीडीसॉफ्ट या बल्गेरियन कंपनीने निधी दिला होता.
-
ही कामगिरी करून परतल्यानंतर मॅक रुदरफोर्डने प्रसारमाध्यमांना सांगितले की, त्यांचा पाच महिन्यांचा विमान प्रवास अप्रतिम होता.
-
हा प्रवास करताना मला खूप आनंद होत होता. तो एक अतिशय रोमांचक आणि मनोरंजक प्रवास होता, असंही रुदरफोर्डने सांगितलं.
-
एकट्याने विमान प्रवास करताना अनेकदा भीती वाटली, पण मी हिंमत हरली नाही, असंही रदरफोर्डने सांगितलं.
-
मॅक रुदरफोर्डला वयाच्या ११ व्या वर्षीच आकाशात उडण्याची इच्छा होती. त्याचे वडीलही व्यावसायिक वैमानिक असल्याने त्यांनं वडिलांसोबत अनेकदा उड्डाण केलं आहे.
-
तो १५ वर्ष ३ महिन्यांचा असताना त्याला मायक्रोलाइट पायलटचा परवाना मिळाला.
-
या परवान्यामुळे तो जगातील सर्वात तरुण पायलट बनला आहे. (सर्व फोटो-इन्स्टाग्राम)
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल