-
पुरातत्वशास्त्रज्ञांच्या एका आंतरराष्ट्रीय गटाने इराकमधील कुर्दिस्तान प्रदेशात ३,४०० वर्षे जुने शहर शोधून काढले आहे.
-
हजारो वर्षे जुने हे शहर टायग्रिस नदीखाली सापडले. पुरातत्व शास्त्रज्ञांनी नुकतीच याबाबत माहिती दिली आहे.
-
पुरातत्वशास्त्रज्ञांच्या गटाने नोंदवले की, त्यांना इराकमधील टायग्रिस नदीच्या तळापासून ३,४०० वर्षे जुन्या शहराचे अनेक अवशेष सापडले आहेत.
-
हे शहर मितनी साम्राज्यात १४७५ ईसवी सन पूर्व BC आणि १२७५ ईसवी सन पूर्वदरम्यान स्थायिक झाले होते.
-
टायग्रिस नदीच्या काठावर असलेल्या मोसुल धरणातील कमी पाण्यामुळे या शहराचा शोध लावणे शक्य झाले.
-
सापडलेल्या अवशेषांमध्ये मातीच्या-विटांच्या भिंती, अनेक टॉवर, बहुमजली इमारती आणि इतर मोठ्या वास्तूंचा समावेश आहे
-
या वस्तू मितानी साम्राज्याच्या या प्राचीन शहराबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढवतात.
-
या साम्राज्यात व्यापार केंद्राच्या अस्तित्वााबाबत दाट शक्यता वर्तवण्यात येतेय.
-
पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. इव्हाना पुलजीझ यांनी निदर्शनास आणून दिले की इमारती काळजीपूर्वक मातीच्या जाड भिंतींनी डिझाइन केल्या होत्या.
-
येथून मातीच्या १० क्यूनिफॉर्म गोळ्याही सापडल्या आहेत. क्युनिफॉर्म ही प्राचीन लेखनशैली आहे. सध्या ते अनुवादासाठी पाठवण्यात आल्या आहे.
-
विशेष म्हणजे पाण्याखाली असूनही शहरातील माती-विटांच्या भिंती चमत्कारिकरित्या जतन करण्यात आल्या होत्या. १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला येथे मोसुल धरण बांधले गेले तेव्हा हे शहर दफन करण्यात आले. मात्र दुष्काळामुळे ते पुन्हा पृष्ठभागावर आले आहे.
-
अहवालानुसार, बुडण्यापूर्वी या जागेची पुरातत्वशास्त्रज्ञांनी कसून तपासणी केली नव्हती. पण डिसेंबरपासून या भागात भीषण दुष्काळ पडल्यामुळे या शहराचा एक हिस्सा पृष्ठभागावर आला आहे.
-
या शोधानंतर मितानी राज्याबाबत अधिक माहिती समोर येईल, असे पुरातत्वशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. अलिकडच्या दशकातील एक महत्त्वाचा पुरातत्व शोध म्हणून त्यांनी याचे वर्णन केले आहे. (All Photos : Credit: Universities of Freiburg and Tübingen, KAO)

‘याचा रोल किती हा बोलतो किती?’ संतोष जुवेकर अक्षय खन्नासंदर्भातील ट्रोलिंगबद्दल म्हणाला, “माझं नशीब…”