-
Titanic footage emerges after 110 years: १९१२ साली समुद्रात बुडालेले टायटॅनिक अनेकदा चर्चेचा विषय बनले आहे. समुद्रात बुडण्याच्या काही दिवस आधी हे जहाज इंग्लंडहून अमेरिकेला रवाना झाले होते. दिसायला अतिशय प्रेक्षणीय असलेले हे सुंदर जहाज पहिल्याच प्रवासाला निघाले होते, ते नक्कीच बुडण्यासारखे नव्हते. ११० वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या या जहाजाचे काही फुटेज आणि फोटोज समोर आली आहेत. जे रिलीज होताच चर्चेचा विषय बनले आहेत.
-
तब्बल ११० वर्षांनंतर टायटॅनिकच्या विमानाच्या दुर्घटनेची नवीन फोटोज प्रसिद्ध झाली आहेत. हे नुकतेच प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे फोटोज हाय रिझोल्युशनमध्ये प्रसिद्ध झाली आहेत. ओशियनगेट एक्सपिडीशन नावाच्या एक्सप्लोरेशन कंपनीने ते जारी केले आहे. या कंपनीचा उद्देश लोकांना टायटॅनिक आणि इतर सागरी गुपितांची जाणीव करून देणे हा आहे. या नवीन चित्रांमध्ये जे दिसतं ते नवीन फीचर्ससह बरेच तपशीलवार दिसत आहे.
-
टायटॅनिक हे जगातील सर्वात मोठे वाफेवर चालणारे प्रवासी जहाज होते. जे १४ एप्रिल १९१२ रोजी हिमखंडाशी आदळल्यानंतर बुडाला. डेली स्टारच्या मते, ११० वर्षांपूर्वी १९१२ मध्ये टायटॅनिक बुडाल्यानंतर हा पहिलाच व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ डायव्हिंग टुरिस्ट कंपनी ओशियनगेट एक्नेसपिडीशनने कॅप्चर केला आहे आणि युट्यूबवर वर पोस्ट केला आहे.
-
हे फोटोज हाय रिझोल्यूशन कलरमध्ये एक आश्चर्यकारक माहिती देत आहेत, जे १९१२ मध्ये टायटॅनिक बुडाल्यानंतर कधीही पाहिले गेले नाही.
-
टायटॅनिक एक्सपर्ट रॉय गोल्डन यांच्या मते, आता आलेले फोटोज असे तपशील दर्शवत आहेत, जे आजपर्यंत पाहिले गेले नाहीत.
-
यामध्ये अँकर मेकरचे नाव स्पष्ट दिसत आहे, जे कधीच कोणाला माहीत नव्हते. त्याच्या अभ्यासासाठी रॉयने अनेक वेळा समुद्राखाली डुबकी मारली, परंतु त्यांना इतका तपशील कधीच सापडला नाही.
-
कालांतराने टायटॅनिकच्या स्थितीत होणार्या बदलांचा मागोवा घेण्यासाठी ओशनगेट आता वार्षिक आधारावर परत जाण्याची योजना आखत आहे.
-
ओशियनगेट एक्चेसपिडीशनचे अध्यक्ष स्टॉकटन रश म्हणाले, “८००० रिझोल्यूशन फुटेजमधील आश्चर्यकारक फोटोज शास्त्रज्ञ आणि सागरी पुरातत्वशास्त्रज्ञांच्या टीमला २०२३ मध्ये आणि त्यापुढील काळात टायटॅनिकच्या विनाशाचे अचूकपणे चित्रण करण्यास मदत करतील.” मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने या वर्षी मे महिन्यात नॉर्थ अटलांटिकमध्ये ८ दिवसांच्या मिशनमध्ये हा व्हिडीओ कॅप्चर केला होता.
-
टायटॅनिक एका हिमखंडाला धडकले आणि बुडाले. १५ एप्रिल १९१२ रोजी झालेल्या या अपघातात १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. आता या टायटॅनिकची काही ताजे फोटोज समोर आली आहेत. जे पोस्ट आणि अपलोड होताच सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. (All Photos : OceanGate Expeditions )
११ मार्च पंचांग: महादेवाच्या कृपेने मिथुन, कर्क राशीला विविध मार्गे होणार लाभ; तुमच्या आयुष्यात होणार का नवे बदल? वाचा राशिभविष्य