-
रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या भन्नाट उपाययोजना नेहमीच सामान्य नागरिकांकडून उचलून धरल्या जातात. प्रवासाचा वेळ कमी करणे असो किंवा इंधनांचे दर वाढत असताना हायड्रोजन कार सारखा हुकुमी एक्का बाहेर काढणे असो गडकरींचे निर्णय भारतीयांच्या हिताचे सिद्ध झाले आहेत.
-
आज आपण गडकरींच्या स्वप्नातील अशाच दहा हटके कल्पनांविषयी जाणून घेणार आहोत. चला तर सुरु करूयात..
-
पुण्यात एका कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणे गडकरींनी रोप वे केबल कारची कल्पना मांडली आहे. हवेत उडणाऱ्या या बसमध्ये एकावेळी १५० लोक प्रवास करू शकतात. या योजनेत पुणे पालिकेने पुढाकार घेतल्यास अनुदानही पुरवण्याबाबत गडकरींनी आश्वासन दिले आहे.(फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
नितीन गडकरींनी एका भाषणात सांगितले होते की ते देशात पाण्यापासून हायड्रोजन निर्मिती करू इच्छितात. पेट्रोलपेक्षा कित्येकपट कमी किमतीत हायड्रोजन उपलब्ध करून देशात फक्त कारच नव्हे तर ट्रेन व विमानसेवा सुद्धा हायड्रोजनच्या सहाय्यातून सुरु करणे हा त्यांचा मानस आहे. (फोटो: संग्रहित)
-
ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी गाड्यांचे हॉर्न बदलून त्यातून संगीत ऐकू येईल अशी योजना गडकरींनी मांडली होती. बासरी, तबला, पेटी यांचे संगीत हॉर्नमध्ये बसवण्याचा विचार सामान्य नागरिकांना भलताच आवडला होता. (फोटो: संग्रहित)
-
नितीन गडकरी यांनी २०३० पर्यंत देशातील पेट्रोल- डिझेलच्या गाड्या संपवण्यासाठी इलेक्ट्रिक कारचा पर्याय समोर आणला आहे. केवळ खाजगीच नव्हे तर सार्वजनिक वाहतूक सुद्धा इलेक्ट्रिक करण्यावर त्यांचा भर आहे. मुंबईत या महिन्यात पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बस धावली होती. (फोटो: संग्रहित)
-
बहुमजली रस्ते जे सहसा आपण परदेशात चित्रित केलेल्या सिनेमात पाहिले असतील त्यांना भारतात बांधण्याचा गडकरींचा प्लॅन यशस्वी झाल्यास वाहतुकीच्या समस्यांवर मोठे समाधान मिळू शकेल. सध्या नागपूरमध्ये अशा प्रकारची रस्ते बांधणी पाहायला मिळते. असेच काम चेन्नई व जोधपूर मध्येही सुरु आहे. (फोटो: Freepik)
-
देशातील टोलनाके बंद करून त्याजागी आधुनिक प्रणालीवर गडकरींची टीम काम करत आहे. सॅटेलाईटच्या मदतीने गाडीची नंबर प्लेट स्कॅन करून आपोआप बँकेतून टोल आकारला जाईल अशी तरतूद करण्यात येत आहे. (फोटो: संग्रहित)
-
पेट्रोल व डिझेलपेक्षा अधिक पर्यावरणपूरक व स्वस्त असा इथेनॉलचा वापर वाढण्यासाठी गडकरी प्रयत्न करत आहेत. सध्या पेट्रोल डिझेल मध्ये २२ टक्के इथेनॉल मिश्रण करून देण्याची परवानगी सरकारने दिलेली आहे. (फोटो: संग्रहित)
-
रस्तेबांधणी दरम्यान होणारी वृक्षतोड कमी करण्यासाठी झाडांना एका ठिकाणाहून उचलून इतरत्र शिफ्ट करण्याचा पर्याय गडकरींनी अंमलात आणत आहेत. जिथे वृक्षतोडीला पर्याय नसेल तेव्हा कापलेल्या झाडांहून अधिक झाडे इतर ठिकाणी लावण्याचा निर्णय गडकरींच्या नेतृत्वात पाळला जात आहे. (फोटो: संग्रहित)
-
देशात लडाख ते कन्याकुमारी रस्त्यांचे उत्तम नेटवर्क तयार करण्यावर गडकरींचा भर आहे, याशिवाय भारताच्या सीमांवर होणाऱ्या रस्ते वाहतुकीसह हेलिकॉप्टर व लढाऊ विमाने उतरवता येतील अशा गुणवत्तेचे रस्ते तयार करण्यावर भर दिला जात आहे. (फोटो: संग्रहित)
-
रस्ते वाहतुकीच्या सुरक्षेसाठी गडकरींच्या नेतृत्वात अनेक जनजागृती उपक्रम राबवण्यात आले आहेत. सोबतच गाड्यांच्या निर्मितीमध्ये सुद्धा अनेक अपडेट्स करण्यात आले आहेत. (फोटो: संग्रहित)

मासिक पाळी आलेल्या विद्यार्थीनीबरोबर शाळेचं क्रूर कृत्य, आईने व्हिडिओ रेकॉर्ड केल्यामुळे सत्य आलं समोर; चौकशीचे आदेश