-
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे टेली टाऊनच्या सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत.
-
ते त्यांच्या क्युट केमिस्ट्रीसाठी ओळखले जातात. यांच्या जोडीचे असंख्य चाहते आहेत.
-
बिग बॉसच्या शो दरम्यान दोघांच्या प्रेमाची सुरुवात झाली होती. तेव्हापासून ही जोडी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. चाहत्यांनी त्यांच्या जोडीला तेजरन नाव दिले आहे.
-
सध्या सर्वत्र गणेश उत्सव साजरा केला जात असून सर्वत्र उत्साह पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत तेजस्वी आणि करणन दोघांनी मिळून गणेश चतुर्थीचा सण साजरा केला.
-
बॉलीवूडपासून ते टीव्ही इंडस्ट्रीपर्यंतच्या सेलिब्रिटींनी घरोघरी गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली आहे.
-
अशा परिस्थितीत करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांनीही त्यांच्या घरात बाप्पाची मूर्ती बसवली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
-
तेजस्वी प्रकाश ही गणेशाची निस्सीम भक्त आहे आणि तिला बिग बॉस १५ च्या घरात अनेकदा बाप्पाची पूजा करताना बघितले आहे.
-
आता गणेश चतुर्थीच्या निमित्ताने करण आणि तेजस्वीने हा सण एकत्र साजरा केला आणि त्यांचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.
-
तेजाने तिच्या घरी गणपती उत्सवातील काही मनमोहक फोटो शेअर केले आहेत.
-
तिने करण कुंद्रा आणि त्याच्या आईसोबत गणपती उत्सवातील फोटो शेअर केले आहेत.
-
याशिवाय तेजस्वीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर काही फोटोही शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती गणेशाच्या मूर्तीसमोर मोदक अर्पण करताना दिसत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’ असे कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे.
-
बिग बॉस १५ मुळे चर्चेत आलेली ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. त्यांचे गणेश उत्सवातील शेअर केलेले फोटो व्हायरल होत आहेत आणि चाहत्यांनी त्यावर वेगवेगळ्या कंमेंट देखील दिल्या आहेत.(सर्व फोटो सौजन्य: twitter)

RCB vs GT: विराटला गोलंदाजी करता करता थांबला सिराज, दोघेही झाले भावुक; गिलच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष; VIDEO होतोय व्हायरल