-
आज या जगात असंख्य brands चे असंख्य लोगो आहेत. पण, त्यातले काही प्रसिद्ध लोगोच आपण ओळखतो. जसे की, Apple, Adidas, LG इत्यादी. पण प्रत्येक लोगोला एक अर्थ असतो. लोगोचा रंग, त्याचा आकार, त्यातील शब्द हे लोगोचा इतिहास दर्शवितात. आज आपण अशाच काही लोगोंबद्दल जाणून घेणार आहोत.
-
सुरुवातीला amazon चा लोगो खपू साधा होता. कालांतराने त्यात खपू बदल होत गेले. त्यानंतर २००० साली कंपनीने नवीन लोगो लॉन्च केला. लोगोत एक खाली बाण काढला. जो A आणि Z ला लक्ष्य करतो.
-
याचा अर्थ amazon ग्राहकांच्या A to Z गरजा पूर्ण करते असा होतो. त्याचबरोबर smile shape मध्ये असलेला हा बाण ग्राहकांना समाधान आणि मैत्रीपूर्ण नातं असल्याचं दर्शवतो. विश्वास दाखवतो.
-
बास्किन रॉबिन्स ही जगातील सर्वात प्रसिद्ध आइस्क्रीम कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचा लोगोही अतिशय प्रसन्न बनवण्यात आला आहे. मात्र, यातही एक विशेष अर्थ दडलेला आहे. जर तुम्ही बास्किन रॉबिन्स लोगो बारकाईने पाहिल्यास त्यावर बनवलेले अर्धे ‘B’ आणि ‘R’ गुलाबी रंगाचे आहेत आणि बाकीचे प्रत्येक अक्षर निळ्या रंगाचे आहे.
-
या लोगोमधला गुलाबी भाग आहे तो ३१ अंक दर्शवतो. ज्याचा अर्थ या कंपनीकडे आईस्क्रीमचे ३१ फ्लेवर आहेत असा आहे.
-
Adidas कंपनीचा निर्माता Adolf Dassler. याच्या टोपण नावावरुन म्हणजेच Adi Dassler वरून Adidas हे नाव कंपनीला देण्यात आलं. या कंपनीच्या सुरुवातीचा लोगो युरोपियन झाड असलेलं Trefoil च्या पानासारखा होता.
-
पुढे ह्या लोगोच्या डिझाईनमध्ये अनेक बदल झाले. पण, त्यामध्ये असलेल्या तीन पट्ट्या ह्या कायम ठेवण्यात आल्या. आताच्या लेटेस्ट लोगो मधल्या तीन त्रिकोणी पट्ट्या म्हणजेच डोंगरासारख्या दाखवल्या आहेत. ज्याचा अर्थ संघर्ष आणि आव्हान दर्शवतो.
-
Apple कंपनीची स्थापना १९७५मध्ये झाली. त्या काळात कंपनीचा लोगो असा नव्हता. आयझॅक न्यूटनचा लोगो बनवला होता आणि त्याच्या वर एक सफरचंद लटकले होते, परंतु १९७७ मध्ये कंपनीचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी नवीन लोगो डिझाइन करण्याची जबाबदारी रॉब जॅनॉफ नावाच्या ग्राफिक डिझायनरला दिली.
-
CodesGesture नावाच्या वेबसाइटनुसार, रॉब जॅनॉफ यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांनी लोगोसाठी प्रथम संपूर्ण सफरचंद निवडले पण नंतर ते अर्धे कापले गेले. जेणेकरून लोकांना सहज समजेल की ते सफरचंद आहे चेरी किंवा टोमॅटो नाही.
-
डेलच्या लोगोकडे नीट लक्ष दिल्यास, लोगोमधील “ई” तिरकस असल्याचे तुम्हाला दिसून येईल. हे फक्त डिझाइनसाठी बनवलेले नाही.
-
कंपनीच्या विकासाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये, संस्थापक म्हणाले “जगाला कान लावा”. कोन असलेला “ई” या दृष्टिकोनाचा संदर्भ देते.
-
या सगळ्याशिवाय डॉमिनोज पिझ्झाच्या लोगोवरील तीन ठिपके तुमच्या लक्षात आलेच असतील. बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की येथे हे ठिपके केवळ डिझाइनसाठी बनवले आहेत.
-
डोमिनोजच्या लोगोवरील हे तीन ठिपके डॉमिनोज स्टोअरच्या पहिल्या तीन स्थानांचे प्रतिनिधित्व करतात.
-
कार जगतातला हा एक विश्वासू ब्रॅंड म्हणून ओळखला जातो. बहुतके लोकांना Hyundai कंपनीचा logo ‘H’ हा त्याच्या स्पेलिंग (spelling) मधल्या पहिल्या अक्षराला अनुसरून आहे असं वाटतं.
-
पण असे नसून या लोगोमधील दोन व्यक्ती हॅंडशेक करत असल्याचा हा सिम्बॉल आहे. हा लोगो कंपनी आणि ग्राहकांमधला व्यवहार दर्शवतो. कालांतराने या लोगोमध्ये बरेच बदल होत गेले.
-
LG च्या लोगोची पार्श्वभूमी लाल रंगात असून LG पांढऱ्या रंगात लिहिलेले आहे. त्याच वेळी, LG च्या मध्यभागी एक पांढरा ठिपका देखील आहे.
-
जर तुम्ही हे नीट पाहिलं, तर तुमच्या लक्षात येईल की एलजी ज्या प्रकारे लिहिलं आहे, ते हसणाऱ्या चेहऱ्याचा आकार तयार करते. एक हसरा चेहरा दर्शवितो की कंपनीचे ग्राहकांशी चांगले आणि मैत्रीपूर्ण व्यवहार आहे.
-
कारच्या जगतातलं आणखी एक महत्वाचं नाव म्हणजे audi. बऱ्याच लोकांची ही ड्रीम कार आहे. तिचा स्पीड, तिचं डिझाईन आणि आरामदायीपणासाठी ती ओळखली जाते. या कारचा लोगोही फार सरळ आणि सुंदर आहे.
-
यात असलेल्या चार रिंग्स हे आपल्याला कार्सचेच टायर आहेत असं वाटतं पण तसं अजिबात नाहीये. सर्वात आधी audi हे नाव कंपनीचे निर्माता August Horch यांच्या Horch या नावावरून पडलं. Horch चा अर्थ ऐकणे असा होतो, त्याला लॅटिन भाषेत Audi असं म्हणतात. Horch – DKW आणि wonder आणि या तीन कंपन्यांची युनिटी दर्शवणारा हा लोगो तयार करण्यात आला.
-
बहुतके लोक toyota चा लोगो बघून कल्पना करतात की तो एक टोपी (Hat) घातलेला cowboy चा लोगो असावा पण तसं नाही. तर हा लोगो सुई दोऱ्याच्या प्रेरणेने बनवला आहे. जो कंपनीचा इतिहास दर्शवतो
-
१९२०-१९३० च्या दरम्यान ही कंपनी शिलाई मशीन बनविण्यात प्रसिद्ध होती. त्याचचं प्रतीक म्हणनू हा लोगो तयार करण्यात आला आहे. या लोगोला व्यवस्थित पाहिलं तर यात कंपनीचं पूर्ण नाव आहे. TOYOTA
-
म्हणजेच Visual Audio Intelligent Organiser हा एक स्मार्ट आणि थोडा टेक्निकल लोगो आहे. VAIO चे पहिले दोन अक्षर हे Analogue wave म्हणजेच तरंग दर्शवतात.
-
आणि शवेटचे दोन अक्षर १ आणि ०. हे binary code मध्ये डिजिटल सिग्नल दर्शवतात.
-
ऑलिम्पिक. ह्या खेळाची संकल्पना इ.स.पूर्व ८ व्या शतकात ग्रीसमधल्या ऑलिंपिया या स्पर्धेची आहे. त्या काळी ग्रीसमधले अनेक राज्य यात सहभाग घेत असत. पांढऱ्या मैदानावर रंगीत निळ्या, पिवळ्या, काळा, हिरवा आणि लाल अशा पाच इंटरलॉकिंग रिंग्स आहेत, ज्याला “ऑलिम्पिक रिंग्स” म्हणनू ओळखलं जातं.
-
हे चिन्ह मुळात १९१३ मध्ये कुर्बटीन या डिझायनरने तयार केले होते. युरोप, आशिया, आफ्रिका, ओश्निया या आणि अमेरिका या पाच लोकवस्ती असलेल्या खंडांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी या रिंग्स तयार करण्यात आल्या आहेत.
-
जिलेट ही एक रेझर कंपनी आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे, या लोगोचा फॉन्ट जरी साधा असला तरी बारकाईने पाहिल्यानंतर हा त्या कंपनीचे उत्पादन वैशिष्ट्य दाखवतो.
-
या मध्ये G आणि I चा लहानसा तुकडा टोकदार करण्यात आला आहे. जो रेझरचा धारदार पणा किंवा टोकदारपणा दर्शवतो.

भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल