-
शापूरजी पालनजी या उद्योगघराण्याचे वारसदार सायरस मिस्त्री यांचे आज पालघर येथे भीषण अपघातात निधन झाले.
-
सायरस यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा श्रद्धांजली वाहिली आहे.
-
सायरस यांच्या निधनावर शोक व्यक्त करत खासदार सुप्रिया सुळेंनी सायरस मिस्त्री हे किती साधे होते याच्या आठवणी सांगितल्या.
-
सुप्रिया सुळे म्हणतात की, सायरस यांना पाणी पुरी, साबुदाणा खिचडी आवडायची. “आमच्या घरी हक्काने येऊन ते स्वतःच्या हाताने खायचे” सायरस यांचं इतकं साधं व्यक्तिमत्व होतं
-
सायरस यांना महागड्या वस्तूंची अजिबात हौस नव्हती. त्यांचे कपड्यांचे कपाट पाहिले तर त्यात सहा कॉटनचे शर्ट व साध्या पँट दिसतील असेही सुळे यांनी सांगितले.
-
सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, ताज हॉटेलमध्ये एकदा पती सदानंद सुळे व सायरस मिस्त्री जेवायला गेले होते
-
तेव्हा सायरस यांच्या साध्या वेशावरून तिथल्या कर्मचाऱ्यांना वाटलं सदानंद हेच सायरस आहेत.
-
गैरसमजामुळे सदानंद सुळे यांना “तुमच्या स्वागताला आलोय” असे कर्मचारी म्हणाले आणि तेव्हा आम्ही सांगितलं हे सदानंद आहेत व हे सायरस आहेत.
-
सायरस यांच्या निधनाने आमच्या कुटुंबाचा एक सदस्य हरपल्याची भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्ती केली.

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल