-
मुंबईत गणेशोत्सवाची धूम काही वेगळीच असते. त्यातून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्तगण आतुर झालेले असतात. सामान्य माणूस असो अथवा सेलिब्रेटी गणेशोत्सवाच्या काळात प्रत्येकजण या राजाच्या चरणी नतमस्तक होतो.
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (रविवार) लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.
-
यावेळी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही उपस्थित होत्या.
-
राज ठाकरेसोबत त्यांचे कार्यकर्त्यांनीही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
-
लालबागच्या राजाचं दर्शन घेतना राज ठाकरे बाप्पा चरणी नतमस्तक झाले.
-
राज ठाकरेंना बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
-
दर्शन घेतल्यानंतर राज ठाकरेंनी उपस्थित लोकांनाही अभिवादन केलं.
-
राज ठाकरेंनी सपत्नीक लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.
-
जून महिन्यात राज ठाकरेंवर हीप बोनची शस्त्रक्रिया करण्यात आली.
-
राज ठाकरे यांच्या नव्याने बांधण्यात घरात ‘शिवतीर्थ’मध्येही गणपतीची स्थापना करण्यात आली आहे.
-
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक भाजपा नेत्यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती.
-
राज ठाकरे यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी अनेकांमध्ये चढाओढ लागल्याचे दिसून येत होते.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”