-
एका वाघाला किती नावे असावीत तर ती ‘वाघडोह’ उर्फ ‘बिग डॅडी’ उर्फ ‘स्केअर फेस’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघाकडे बघून कळेल.
-
सतराव्या वर्षी तो हे जग सोडून गेला, पण त्याच्या आठवणी कायम ताज्या आहेत.
-
ताडोबाच्या मोहर्ली, खातोडा आणि तेलिया च्या विशाल भूभागावर त्याचा एकछत्री अंमल होता.
-
ताडोबावर अधिराज्य गाजवणाऱ्या या वाघाने या व्याघ्रप्रकल्पाला जागतिक पातळीवर ओळख मिळवून दिली.
-
वाघडोह नामक नाल्याजवळ त्याचा जन्म झाला असावा आणि म्हणून त्याला ‘वाघडोह’ हे नाव पडले असावे.
-
वाघडोहच्या वडिलांचे नाव देवडोह. तेसुद्धा मुलाप्रमाणे प्रसिद्ध.
-
चेहऱ्यावर जखमांच्या खुणा कायमस्वरूपी असल्याने त्याला ‘स्केअर फेस’ या नावाने ओळखले जात होते. तर ताडोबातील जवळजवळ ४० वाघांचा तो बाप होता आणि म्हणून त्याला ‘बिग डॅडी ऑफ ताडोबा’ या नावाने देखील ओळखले जात होते.
-
सुरुवातीच्या काळात लाजरा असलेला वाघडोह नंतर मात्र बेधडकपणे पर्यटकांना सामोरे जात होता.
-
त्याचा पर्यटकांच्या वाहनांसमोर मुक्तसंचार हासुद्धा चर्चेचा विषय होता. वय वाढल्याने त्याच्या शिकार करण्यावर मर्यादा आल्या होत्या.
-
सिनाळा गावालगत आपले बस्तान मांडले होते, कारण त्याच्याच वंशावळीने त्याला बाहेर हाकलले होते. तेथेच त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला.
-
१७ वर्ष इतका दीर्घकाळ आयुष्य जगलेला हा राज्यातील एकमेव वाघ असावा.
-
सर्व छायाचित्रे – निखिल तांबेकर (हेही पाहा : ‘सूर्या : द बॉस’ शक्तीप्रदर्शन करून दहशत निर्माण करणारा वाघ)

Chhaava : ‘छावा’ने मोडला ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील सहावा चित्रपट!