-
राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या दोनच महिन्यांत पुढील विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत.
-
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज बारामती दौऱ्यावर असून तिथे बोलताना बावनकुळेंनी भाजपाच्या ‘मिशन बारामती’चीही घोषणा केली. बारामतीत दौऱ्यात त्यांनी भाजपाची आढावा बैठक घेतली असून विविध कार्यक्रमांना हजेरी लावली आहे.
-
यावेळी बावनकुळेंनी पुढील सर्व निवडणुका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजपा एकत्र लढणार असल्याचं जाहीर केलं.
-
युतीच्या माध्यमातून विधानसभेत २००हून अधिक तर लोकसभेत राज्यातून ४५हून अधिक जागा निवडून आणण्याचा निर्धार बावनकुळेंनी व्यक्त केला आहे.
-
महाराष्ट्रात ४५ हून अधिक लोकसभा जागा आणि २०० हून अधिक विधानसभेच्या जागा आमच्या युतीच्या बळावर आम्ही निवडून आणू.
-
जनता विश्वासघात करणाऱ्यांना बाजूला करेल आणि जे खरे हिंदुत्वाचं रक्षण करणारे कार्यकर्ते आहेत, त्यांना जनता मदत करेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असं बावनकुळे म्हटलं आहे.
-
जनता विश्वासघात करणाऱ्यांना बाजूला करेल आणि जे खरे हिंदुत्वाचं रक्षण करणारे कार्यकर्ते आहेत, त्यांना जनता मदत करेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असं बावनकुळे म्हटलं आहे.
-
येत्या दोन महिन्यात मी सर्व जिल्ह्यांचा दौरा करणार आहे.
-
आमच्या संघटनेच्या माध्यातून पुढच्या काळात होणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, येणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही शिवसेना आणि भाजपा युतीच्या माध्यमातून ४५हून जास्त जागा जिंकून आणू , असंही बावनकुळे म्हणाले.
-
यावेळी बोलताना बावनकुळेंनी बारामतीची लोकसभेची जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला.
-
देशात अनेक गड उद्ध्वस्त झाले आहेत. जेव्हा संघटना मजबूत होते, तेव्हा संघर्ष करण्याची ताकद येते. जेव्हा ती ताकद येते, तेव्हा अनेक चांगले गड उद्ध्वस्त होतात, हा देशाचा इतिहास आहे.
-
त्यामुळे कुणाचा गड, वर्चस्व राहात नाही. वेळेनुसार ते बदलत असतं. आम्ही ठरवलंय की आमची ताकद तेवढी वाढवायची आणि आमच्या भरवश्यावर शिवसेना-भाजपानं चांगली कामगिरी करायची आणि ही जागा निवडून आणायची, असा निर्धार बावनकुळेंनी बोलून दाखवला. (सर्व फोटो सौजन्य- ट्विटर)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…