-
टाटा मोटर्सच्या काही गाड्यांवर सप्टेंबर महिन्यात बंपर डिस्काउंट देण्यात येणार आहे. यात काही CNG मॉडेलचा देखील समावेश आहे. जर तुम्ही नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल तर टाटाच्या या गाड्यांचा नक्की विचार करू शकता. कोणत्या कारवर किती डिस्काउंट आहे जाणून घ्या.
-
टाटा हॅरियरवर एक्सचेंज बोनस म्हणून एकूण ४०,००० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. याशिवाय ५,००० रुपयांची कॉर्पोरेट सूट उपलब्ध आहे. हॅरियर एसयूव्हीच्या सर्व व्हेरियेंटवर ही सूट उपलब्ध आहे. या एसयुव्हीमध्ये २.० लिटर डिझेल इंजिन उपलब्ध आहे.
-
टाटा सफारीवर एक्स्चेंज बोनस म्हणून ४०,००० रुपयांचा डिस्काउंट उपलब्ध आहे. पण यावर कोणतीही कॉर्पोरेट सूट उपलब्ध नाही. तसेच हॅरियरप्रमाणे टाटा सफारीच्या सर्व व्हेरियेंटसवर ही सूट उपलब्ध आहे.
-
टाटा मोटर्स प्रथमच टाटा टिगोर सीएनजी या सीएनजी मॉडेलवर डिस्काउंट देत आहे. टाटा टिगोर सीएनजीवर १५,००० रुपयांची सूट आणि १०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळत आहे. टिगोर सीएनजीमध्ये १.२ लिटर इंजिन उपलब्ध आहे, जे ६९ bhp आणि ९५ Nm टॉर्क बनवते, जे मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
-
टाटा टिगोरच्या सर्व व्हेरिएंटसवर २०,००० रुपयांचा डिस्काउंट उपलब्ध आहे. यामध्ये १०,००० रुपयांची रोख सवलत आणि १०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस उपलब्ध आहे. टाटा टिगोरमध्ये सीएनजी व्हेरियंट प्रमाणेच १.२ लिटर इंजिन उपलब्ध आहे. परंतु हे ८४ बीएचपी आणि ११३ एनएम टॉर्क विकसित करते.
-
टाटा टियागो हॅचबॅकवर १०,००० रुपयांची रोख सूट आणि १०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळत आहे. म्हणजेच यावर एकुण २०,००० रुपयांचा डिस्काउंट उपलब्ध आहे. काही डीलरशिप हॅचबॅकवर ३,००० रुपयांची अतिरिक्त कॉर्पोरेट सूट देखील देतात. परंतु टियागोच्या सीएनजी मॉडेलवर कोणताही डिस्काउंट उपलब्ध नाही.(सर्व फोटो सौजन्य : Tata Motors)

09 April Horoscope: अचानक लाभ अन् मौल्यवान वस्तूंची खरेदी, कोणत्या राशीच्या नशिबात कसे येईल सुख? वाचा बुधवारचे राशिभविष्य