-
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले आहे. जगभरातील अनेक फोटोग्राफर्सनी एलिझाबेथ द्वितीय यांच्या आयुष्यातील विविध टप्प्यावर त्यांचे फोटो टिपले आहेत, यातीलच काही खास क्षण व ब्रिटनच्या महाराणींविषयी न ऐकलेल्या गोष्टी पाहुयात..
-
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची कारकीर्द ७० वर्षे, ७ महिने आणि २ दिवस इतकी प्रदीर्घ होती. या काळात त्यांनी ४००० हून अधिक कायद्यांना मान्यता दिली आहे.
-
एलिझाबेथ द्वितीय यांच्या कार्यकाळात त्यांनी एकूण १५ पंतप्रधानांची नियुक्ती केली. यात विस्टन चर्चिल यांच्यापासून लिज ट्रस यांच्यापर्यंत अनेकांचा समावेश आहे.
-
महाराणी एलिझाबेथ द्वितीय व प्रिन्स फिलिप यांच्या लग्नात त्यांचा मुकुट तुटला होता. यावेळी मुकुटातील हिरे नीट करण्यासाठी ताबडतोब कोर्ट ज्वेलर्सला बोलावून घेण्यात आले होते.
-
महाराणी एलिझाबेथ द्वितीय या कधीच शाळेत गेल्या नव्हत्या. त्यांच्या बहिणीसोबत त्यांना घरीच शिकवणी दिली गेली होती.
-
महाराणी एलिझाबेथ द्वितीय आपल्या कारकिर्दीत १०० हून अधिक देशांना भेटी दिल्या. २०१६मध्ये, बकिंगहॅम पॅलेसने सांगितले की त्यांनी ११७ राष्ट्रांमध्ये किमान १६, ६१, ६६८ किमी प्रवास केला आहे.
-
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांच्या बहिणीसोबत लंडनच्या रस्त्यांवर अनोळखी व्यक्तींसह आनंद साजरा केला होता. एलिझाबेथ यांनी दुसऱ्या महायुद्धात ट्रक ड्रायव्हर आणि मेकॅनिक म्हणून स्वेच्छेने काम केले होते.
-
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना रोख रकमेची आवश्यकता असेल हे दुर्मिळ असले तरी, बकिंघम पॅलेसच्या तळघरात त्यांचे खासगी एटीएम होते.
-
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना रस्त्यावर वाहन चालविण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स असण्याची गरज नव्हती. इतकेच नाही तर महाराणी एलिझाबेथ यांच्याकडे पासपोर्टही नव्हता.

लोकांच्या जीवाशी खेळ! कलिंगड विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल