-
यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गणपती सोहळा ताऱ्यांच्या उपस्थितीने उजळून निघाला.
-
सर्व बॉलिवूड कलाकार पारंपरिक पोशाखात मुख्यमंत्र्यांच्या मलबार हिल येथील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी दाखल झाले होते. पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ११ दिवसांचा गणपती सार्वजनिकरित्या साजरा करण्यात आला आहे.
-
अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवास्थानी नुकतचं बाप्पाचं दर्शन घेतलं आहे.
-
मराठमोळी जोडी रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी हजेरी लावली असून बाप्पाचं दर्शन घेतलं.
-
बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूर आणि मुलगी अभिनेत्री श्रद्धा कपूर यांनी देखील एकनाथ शिंदेंच्या घरी बाप्पाचं दर्शन घेत शिंदेंना शुभेच्छा दिल्या आहेत.
-
तसंच अभिनेत्री तमन्नाने देखील ‘वर्षा’ वर दाखल होत, गणेशाचे दर्शन घेतले.
-
अभिनेता जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी या कलाकारांनी देखील बाप्पाचे दर्शन घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
-
या सर्व कलाकारांनी बाप्पाचा आशीर्वाद घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. तसंच, एकत्र जेवणाचा आस्वाद देखील घेतला.(सर्व फोटो: instagram/viralbhayani)
