-
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वयाच्या ९६ वर्षी निधन झालं. बंकिंगहम पॅलेसने याबाबत अधिकृतपणे माहिती दिली.
-
त्यांनी स्कॉटलंडमध्ये गुरुवारी (८ सप्टेंबर) अखेरचा श्वास घेतला.
-
मागील ७० वर्षांपासून त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर होत्या. १९५२ मध्ये त्या पदावर आल्या होत्या.
-
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय कोट्यावधींची संपत्ती मागे सोडून गेल्या आहेत.
-
या संपत्तीमध्ये त्यांच्या विंटेड गाड्यांचाही समावेश आहे.
-
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्याकडील वाहनांच्या यादीत समावेश असलेले पहिले नाव म्हणजे बेंटले स्टेट लिमोझिन (Bentley State Limousine). या गाडीची किंमत जवळपास ८७ कोटी ५८ लाख ४७ हजार ५०० इतकी आहे. ही गाडी जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात महागडी कार आहे. ही कार बेंटलेने राणी एलिझाबेथ द्वितीय यांना ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भेट म्हणून दिली होती.
-
राणी एलिझाबेथ यांच्याकडे बेंटले बेंटायगा (Bentley Bentayga) ही देखील महागडी गाडी आहे. ही गाडी म्हणजे बेंटलेची पहिली एसयूव्ही आहे. ही गाडी जगातील सर्वात शक्तिशाली आणि वेगवान SUV पैकी एक आहे. बेंटलेने राणी एलिझाबेथला वाहन सुपूर्द करण्यापूर्वी त्यात अनेक बदल केले. या कारची किंमत जवळपास ४ कोटी १० लाख इतकी आहे.
-
Land Rover ची Street Review ही एक हाइब्रिड कार आहे. लँड रोव्हरने २०१५ मध्ये राणी एलिझाबेथला ही गाडी भेट म्हणून दिली होती. ही गाडी चॉकलेटी रंगाची आहे. या गाडीचा वापर एलिझाबेथ या परेडच्या दरम्यान करायच्या.

