-
ऐश्वर्या नारकर हे मराठी मालिका, नाटक, सिनेमामधील एक मोठं नाव आहे.
-
‘या सुखांनो या’ मालिकेतील हळवी भूमिका ते ‘लेक माझी लाडकी’ मालिकेतून दिसलेली नकारात्मक छटा असलेलं पात्र, या सर्व प्रवासात त्यांच्या भूमिका कायम लक्षात राहिल्या.
-
मालिकांसोबतच आता सोशल मीडियावरही त्या ऍक्टिव्ह आहेत.
-
सोशल मीडियावर तोकड्या कपड्यांची फॅशन असताना ‘अस्सल भारतीय नारी’ रूपात ऐश्वर्या नारकर साडी नेसून फोटो पोस्ट करतात
-
ऐश्वर्या नारकर यांना सर्व प्रकारच्या साड्यांची आवड आहे, अगदी रेट्रो स्टाईल किंवा अस्सल पेशवाई नऊवारी असो सर्व रूपात त्यांचं सौंदर्य खुलून दिसतं
-
ऐश्वर्या नारकर यांनी वयाच्या ५२व्या वर्षी सुद्धा स्वतःला अगदी फिट ठेवले आहे. त्यांची व्यायामाची आवड फोटोमधून नक्कीच दिसून येते.
-
निखळ हास्य, मोकळे लांब केस आणि वाऱ्यावर उडता पदर या रूपातील ऐश्वर्या नारकर यांच्यावर त्यांचे चाहते पूणर्पणे फिदा आहेत. त्यांचे १ लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत.
-
ऐश्वर्या नारकर या अनेकदा आपले पती अविनाश नारकर व मुलगा अमेय नारकर यांच्यासोबत रील्स सुद्धा शेअर करत असतात.
-
ऐश्वर्या नारकर यांच्या साडीचे कलेक्शन पाहून अनेकदा त्यांना साडीचा व्यवसाय करण्याचा सल्लाही त्यांच्या महिला चाहत्या देत असतात.
-
ऐश्वर्या नारकर यांचे सौंदर्य तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की कळवा.
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO