-
गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाली होती.
-
या बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झालं आहे. शनिवारी मध्यरात्री दादरमध्ये शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये तुफान राडा झाला.
-
या प्रकारानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दादर पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना नेते सुनील शिंदे यांनी केला आहे.
-
हा गोळीबार झाल्यानंतर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारीदेखील भयभयीत झाले होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
-
याबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते अरविंद सावंत म्हणाले की, ठाकरे सरकारनं गुंडांचा बंदोबस्त केला. त्यांच्या कारकिर्दीत एकही दंगा घडला नाही. कुणाची हिंमतही झाली नाही.
-
आता राज्यकर्तेच बोलत आहेत. एक म्हणतो चुन चुन के मारेंगे, दुसरा म्हणतो तंगड्या तोडीन, तिसरा आमदार गोळीबार करतो. चौथी महिला खासदार पोलीस स्थानकात जाऊन पोलिसांशीच गैरवर्तन करते. पण गुन्हा दाखल होत नाही, अशी टीका सावंतांनी केली आहे.
-
शिंदे गटाचे पदाधिकारी संतोष तेलवणे म्हणाले की, “काल रात्री मी माझ्या बिल्डिंगखाली उभा होतो, तेव्हा उद्धव ठाकरे गटाचे ५० जण आले. तेव्हा मी एकटाच होतो. पण मीसुद्धा त्या ५० जणांना पुरुन उरलो. मी त्यांना म्हणालो, तुम्हाला हात लावायचा असेल हात लावा, मला ठार मारा. जिवंत ठेवलात तर तुम्हा ऐकेकाला घरातून उचलून नेईन”
-
“गणपती विसर्जनावेळी आमची मिरवणूक चांगली झाली. आमच्या मिरवणुकीपुढे ठाकरे गट फिका पडला. त्यामुळे ही मारहाण केली गेली” असंही संतोष तेलवणे म्हणाले.
-
दरम्यान, या सगळ्या प्रकरणावरून आता मनसेनं शिवसेनेला टोला लगावला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
-
“दादर, माहीम, प्रभादेवी हे एक सुसंस्कृत मतदारसंघ आहेत. अशा प्रकारच्या हाणामाऱ्या करायला हे काही बिहार राज्य नाही. पोलिसांनी योग्य ती चौकशी करावी आणि जे दोषी असतील, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी”, असे संदीप देशपांडे म्हणाले.
-
“शिवसेनेनं जे अडीच वर्षांत पेरलंय, ते आता उगवतंय. तुम्ही अडीच वर्षांत लोकांवर खोट्या केसेस टाकल्या, त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला.
-
या सर्व प्रकरणावर सदा सरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली असून आपण गोळीबार केलाच नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. आपण स्थानिक आमदार असल्याने हा बदनामीचा प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”