-
आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा २३ धावांनी पराभव करत विजय मिळवला.
-
श्रीलंकेने आशिया कपवर सहाव्यांदा नाव कोरले.
-
वानिंदू हसरंगाची (३६ धावा व तीन बळी) अष्टपैलू चमक, डावखुऱ्या भानुका राजपक्षेची (नाबाद ७१) अप्रतिम खेळी आणि प्रमोद मदूशानच्या (चार बळी) भेदक माऱ्याच्या जोरावर श्रीलंकेने विजय मिळवला.
-
श्रीलंकेने पाकिस्तानसमोर १७१ धावांचे आव्हान ठेवले. लंकेच्या १७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव १४७ धावांत संपुष्टात आला.
-
या विजयासाठी श्रीलंकेला मोठी बक्षीस रक्कम मिळाली आहे.
-
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी १.५ लाख डॉलर्सचा धनादेश कर्णधार दासुन शनाकाकडे सुपूर्द केला.
-
यासोबतच ‘प्लेअर ऑफ द मॅच’ आणि ‘प्लेअर ऑफ द सिरीज’सह अनेक खेळाडूंना बक्षीस मिळाले आहेत.
-
श्रीलंकेने फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर संघाला १.५ लाख डॉलरचा चेक देण्यात आला. भारतीय रुपयानुसार १.२ कोटी इतकी रक्कम आहे.
-
वानिंदू हसरंगा याला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ म्हणून गौरविण्यात आले आहे. त्याला १५ हजार डॉलरचा धनादेश देण्यात आला. भारतीय रुपयानुसार हे सुमारे १२ लाख रुपये आहे.
-
भानुका राजपक्षेला अंतिम सामन्यासाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून गौरविण्यात आले. राजपक्षे यांना ५ हजार डॉलर्सचा धनादेश देण्यात आला. भारतीय रुपयानुसार हे सुमारे ३ लाख ९८ हजार रुपये आहे.
-
तर सामन्यातील सर्वोत्तम झेलसाठी ३ हजार डॉलर्सचा धनादेश देण्यात आला. भारतीय रुपयानुसार हे सुमारे २ लाख ३९ हजार रुपये आहे.
-
पाकला बक्षीस म्हणून ७५वहजार डॉलर (सुमारे ६० लाख रुपये) देण्यात आले आहे.

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन