-
स्वतःकडे चारचाकी गाडी असावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते. शहर असो किंवा गाव प्रत्येक ठिकाणी स्वतःची गाडी असण्याची गरज भासतेच. परंतु इतर सर्व वस्तूंप्रमाणेच गाड्यांच्या किंमतीदेखील वाढल्या आहेत.
-
अशात पैशांची जुळवाजुळव करुन कोणती गाडी घेता येईल याचा विचार केला जातो किंवा इएमआयचा पर्याय स्वीकारला जातो. असे वेगवेगळे प्रयत्न करून जेव्हा गाडी घेण्याचा निर्णय होतो, तेव्हा सर्वात उत्तम कार घ्यावी असा विचार प्रत्येकजण करत असतो. अशावेळी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या जाणून घ्या.
-
आयसी इंजिन असलेल्या वाहनांपेक्षा पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्या जास्त आरपीएममुळे चांगल्या चालतात. आयसी इंजिन असलेल्या वाहनांमध्ये सर्वोत्तम नियंत्रित एनव्हीएच पातळीदेखील उपलब्ध असते. जे लोक नियमितपणे लांब पल्ल्याच्या गाड्या चालवतात त्यांच्यासाठी पेट्रोलवर चालणार्या गाड्या हाय रनिंग कॉस्टमुळे महाग पडू शकतात.
-
ज्यांना शहरांमध्ये कारचा अधिक वापर करायचा आहे, त्यांनी कॉम्पॅक्ट, शहरासाठी अनुकूल अशी कार घ्यावी. यासाठी सीएनजी किंवा एलपीजी सारख्या पर्यायी इंधनाच्या गाडयांना प्राधान्य द्यावे. सीएनजी/एलपीजी कारची पॉवर आणि कार्यक्षमता कमी असू शकते, परंतु पेट्रोल आणि डिझेल कारच्या तुलनेत त्यांची किंमत कमी असते.
-
पेट्रोल डिझेलच्या तुलनेत सीएनजी आणि एलपीजी सहज उपलब्धत होत नाही. त्यामुळे शहरात राहणाऱ्या लोकांसाठीच अशा कार घेणे अधिक चांगले आहे. या पर्यायासाठी तुम्ही मारुती सुझुकी एर्टिगा एससीएनजी, ह्युंडाय ऑरा सीएनजी, टाटा टियागो आयसीएनजी या कार खरेदी करू शकता.
-
नवीन कार खरेदी करण्यासाठी इलेक्ट्रिक कारदेखील उत्तम पर्याय आहे. इलेक्ट्रिक कारच्या नियमित देखभालीचा खर्च आयसी इंजिन असलेल्या कारच्या तुलनेत खूपच कमी असतो, त्यामुळे पैशांची बचत होते. परंतु इलेक्ट्रिक वाहनाची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्याची किंमत इतर कारच्या तुलनेत खूप जास्त असते.
-
ज्यांच्याकडे आधीपासून प्रायमरी आयसी इंजिन कार आहे आणि शहरात वापरण्यासाठी त्यांना अतिरिक्त कार हवी आहे त्यांच्यासाठी इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणे हा पर्याय अधिक उत्तम आहे. यासाठी तुम्ही टाटा नेक्सॉन इव्ही, एमजी झेडएस इव्ही, ह्युंडाय कोना इव्ही, ऑडी इ:ट्रॉन या कार खरेदी करू शकता.
-
फुल हायब्रीड वाहनाचा देखभाल खर्च इतर कारच्या तुलनेत सर्वाधिक असतो. पण तरीही जर तुम्हाला पेट्रोल कार आवडत असतील परंतु त्यात चांगले मायलेज हवे असेल, तर तुम्ही फुल हायब्रीड कारची निवड करू शकता.
-
फुल हायब्रीड कारमध्ये चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरवर पूर्णपणे विसंबून न राहता इलेक्ट्रिक मोबिलिटीवर स्विच करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. यासाठी तुम्ही होंडा सिटी इ:एचइव्ही, टोयोटा कॅमरी, टोयोटा अर्बन क्रूजर ह्यरायडर आणि टोयोटा वेलफायर सारख्या कार खरेदी करू शकता. (सर्व फोटो सौजन्य : Freepik)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य