-
Cheetahs coming in India from Namibia: मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आठ चित्त्यांना आणण्यासाठी नामिबियाची राजधानी विंडहोक येथे खास विमान दाखल झाले आहे.
-
विशेष म्हणजे या विमानावर चित्त्याची प्रतिमा रंगवण्यात आली आहे.
-
हे विमान १६ तासांपर्यंत उड्डाण करण्यास सक्षम असल्याने ते इंधन भरण्यासाठी न थांबता थेट नामिबियापासून भारतापर्यंत उड्डाण करणार आहे.
-
आठ चित्त्यांना घेऊन हे विमान आज (१७ सप्टेंबर) रोजी राजस्थानची राजधानी जयपूर येथे पोहोचणार असून त्यानंतर विशेष हेलिकॉप्टरने कुना राष्ट्रीय उद्यानात त्यांना नेण्यात येणार आहे. (AP Photo)
-
पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १७ सप्टेंबर रोजी सकाळी १०.४५ वाजता या चित्त्यांना कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात येणार आहे.
-
भारतात येणाऱ्या पाच नर आणि तीन मादी चित्त्यांचे लसीकरण करण्यात आले असून रेडिओ कॉलर लावण्यात आले आहे. (Image source: Cheetah Conservation Fund)
-
पिंजरे सुरक्षित ठेवण्यासाठी विमानात आणि विशेषकरून मुख्य केबिनमध्ये बदल करण्यात आले आहेत.
-
चित्त्यांसोबत असणाऱ्या पशुवैद्यकांना उड्डाणादरम्यान पिंजऱ्यापर्यंत जाण्यासाठी परवानगी देण्यात आली असून तशी व्यवस्था करण्यात आली आहे. (Image source: Cheetah Conservation Fund)
-
या चित्त्यांना सुरुवातीला खुल्या पिंजऱ्यात सोडण्यात येणार आहे.
-
स्थानिक वातावरणाशी जुळवून घेतल्यानंतर आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आधी नर चित्त्यांना जंगलात सोडले जाईल.
-
दक्षिण आफ्रिकेने चित्त्यांचे इतर देशांमध्ये स्थलांतर केले आहे, पण भारतात हे प्राणी पहिल्यांदाच पाठवले जात आहेत.
-
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी त्यांच्याच हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. (सर्व फोटो सौजन्य : ट्विटर)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा