-
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७२ वा वाढदिवस.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या भाषणांबरोबरच स्टाइल स्टेटमेंसाठी ओळखले जातात.
-
मोदींच्या कपड्यांपासून ते गॉगलपर्यंत अनेक गोष्टींची वेळोवेळी चर्चा होताना दिसतात.
-
काही दिवसांपूर्वीच ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये राहुल गांधींनी ४० हजारांहून अधिक किंमत असणारं टी-शर्ट घातल्याची टीका भाजपाने केल्यानंतर मोदींचा १० लाखांचा सूट चर्चेत आला होता.
-
कल्याणमध्ये तर यासंदर्भातली बॅनर्सही काँग्रेसने लावले होते.
-
अर्थात हा राजकारणाचा भाग झाला तरी देशाचे पंतप्रधान आहेत म्हटल्यावर त्यांच्याकडे महागड्या वस्तू असण्यात काहीच गैर नाही. अनेकदा देशाच्या प्रमुखांना अशा वस्तू भेट म्हणून दिल्या जातात.
-
मात्र त्याच वेळी या वस्तूंची किंमत ही सामान्यांना तोंडात बोटे घालायला लावणारी असते.
-
मोदींच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात त्यांच्याकडे असणाऱ्या काही खास गोष्टी आणि त्यांच्या किंमतीबद्दल…
-
मोदींना गॉगल्सचीही खूप आवड आहे.
-
मोदी अनेकदा वेगवेगळ्या अनौपचारिक कार्यक्रमांमध्ये गॉगल घालून दिसतात.
-
मोदी बुल्गरी या इटालियन ब्रॅण्डचा गॉगल वापरतात.
-
बुल्गरी गॉगल्सची किंमत ३० ते ४० हजार रुपयांच्या दरम्यान असते.
-
मोदींनी २०१९ मध्ये डिसेंबर महिन्यात सुर्यग्रहण पाहताना फोटो ट्विटवरुन शेअर केला होता.
-
यावेळी मोदींना घातलेला गॉगल हा मायबॅच आयवेअर या जर्मन कंपनीचा असल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला होता. हा एक महागडा परदेशी ब्रॅण्ड असून त्याची किंमत हजारोंमध्ये असते.
-
मात्र मोदींचा गॉगल हा ‘द डिप्लोमॅट वन’ प्रकारातील आहे. या गॉगलची किंमत २ हजार १५९ डॉलर आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार या गॉगलची किंमत दीड लाखांहून अधिक आहे.
-
त्यामुळे या गॉगलची भारतातील किंमत ही एक लाख ६० हजारांहून अधिक असल्याचे दावे करण्यात आलेले.
-
तर काही मोदी समर्थकांनी सूर्यग्रहण पाहतानाच्या फोटोमधील गॉगल हा मायबॅच आयवेअर कंपनीचा महागडा गॉगल नसून तो ‘रेट्रो बफेलो हॉर्न ग्लासेस’ हा गॉगल असल्याचा दावा केला.
-
हा गॉगल सात ते दहा हाजारांमध्ये उपलब्ध असल्याचे मोदी समर्थकांनी म्हटलं होतं.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या कपड्यांसाठीही ओळखले जातात.
-
मोदी आजही त्यांची कपडे अहमदाबादमधील जेड-ब्लू यांच्याकडूनच शिवून घेतात.
-
बिपिन आणि जीतेंद्र चौहान यांची ही कंपनी आहे. १९८९ पासून मोदी या दोघांकडूनच कपडे शिवून घेतात.
-
आधी बिपिन आणि जीतेंद्र यांचे एक छोटे दुकान होते आज त्यांनी कंपनीपर्यंत मजल मारली आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ साली अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीप्रसंगी परिधान केलेला वादग्रस्त बंदगळा सूट घातला होता.
-
या सूटवर मोदी मोदी अशी अक्षरे होती. खरेतर या सुटाची नेमकी किंमत कुणालाही माहीत नाही, तरी तो १० लाखांचा असल्याचे मानले जाते. या सूटवर ‘नरेंद्र दामोदरदास मोदी’ असे नाव सोनेरी विणकाम करून कोरलेले आहे.
-
मोदींनी अशापद्धतीने स्वत:च्या नावाचा सूट घातल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. विरोधीपक्षांनी तसेच परदेशी प्रसारमाध्यमांनी मोदींच्या या पेरहावाची टीका केली होती.
-
२०१६ साली झालेल्या लिलावामध्ये हा सूट ४.३१ कोटी रूपयांना विकला गेला आहे. हा टू पीस सूट असून तो विकत घेण्यासाठी चढाओढ लागली होती. नेव्ही ब्लू रंगाचा हा सूट असून तो सुरतचे हिरे व्यापारी लालजी पटेल व त्यांचा पुत्र हितेश पटेल याने सर्वोच्च बोली लावून घेतला. पैसा गंगा स्वच्छतेसाठी जाणार असल्याने आम्ही एवढे पैसे खर्च केल्याचं हितेश यांनी स्पष्ट केलं होतं.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना आवडणाऱ्या घड्याळाची माहिती त्यांच्या आत्मचरित्रामध्येच दिली होती.
-
मोवाडो (Movado) या स्वीझ लक्झरी ब्रॅण्डची घड्याळे मोदींना आवडतात.
-
मोवाडो या कंपनीची स्थापना १९८३ मध्ये झाली आहे. ही कंपनी मोवाडो, इबेल, कॉकर्ड, ईएसक्यू, कोच, ह्युगो बॉस, लाकोस्ट, जुसी कॉर्चर, टॉमी हीलफिंगर नावाने घड्याळे बनवते.
-
मोवाडोच्या घड्याळांची किंमत ३९ हजारांपासून सुरु होते.
-
त्यामुळे तुम्ही मोदींच्या घड्याळाच्या किंमतीची अंदाज लावू शकता.
-
२०२० मधील एका वृत्तानुसार मोदी अॅपल कंपनीचं घड्याळही वापरतात.
-
या घड्याळाची त्यावेळी किंमत ४० हजार रुपये इतकी होती.
-
२०१९ मध्ये एप्रिल महिन्यामध्ये अक्षय कुमारला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोदींनी घड्याळ उलटं घालण्याच्या सवयीबद्दल माहिती दिली होती.
-
‘मी अनेकदा पाहिलयं की तुम्ही घड्याळ उलटं घालता, म्हणजे घड्याळाचे डायल आतल्या बाजूला असते असं का?’, असा सवाल अक्षयने मोदींनी विचारला.
-
घड्याळ उलटं घालण्यासंदर्भातील या प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी एक किस्सा सांगितला होता.
-
‘मी अनेकदा बैठकींमध्ये असतो. त्यावेळी किती वेळ झाला हे पाहण्यासाठी जर मी भेटायला आलेल्या व्यक्तीसमोर घड्याळ पाहिले तर तो त्यांना त्यांचा अपमान झाल्यासारखे वाटू शकते. म्हणूनच मी उलट्या पद्धतीने घड्याळ घातलो कारण वेळ बघायचा झाल्यास मी लोकांसमोर हात वर न करता हळूच वेळ पाहतो,’ असं मोदींनी म्हटलं होतं.
-
घड्याळांप्रमाणेच मोदींना पेनही खूप आवडतात.
-
मोदींकडे पेनचे मोठे कलेक्शन असल्याचं बोललं जातं.
-
मात्र त्यांना माँट ब्लन्क (Mont Blanc) या जर्मन कंपनीचे पेन खूप आवडतात. मोदी हाच पेन वापरतात.
-
मोदींकडे असणाऱ्या माँट ब्लन्क कंपनीच्या पेनची किंमत एक लाख तीस हजार रुपयांच्या आसपास आहे.
-
घड्याळं, चामड्याच्या वस्तू, दागिने अशा वस्तूही प्रामुख्याने मोदींच्या आवडत्या पेन कंपनीकडून तयार केल्या जातात. माऊंट ब्लन्क या पर्वतावरून या कंपनीचं नाव ठेवण्यात आलं आहे. यातल्या काही पेनांच्या निबवर ‘४८१०’ हा आकडा असतोच.
-
पर्वताची एकूण उंची हा आकडा दर्शवतो. यातल्या काही पेनांची निब ही सोन्यापासून बनवली जात असल्याने या पेनची किंमत जास्त असल्याचे म्हटले जाते.
-
निरंजन मुखोपाद्याय यांनी लिहिलेल्या “नरेंद्र मोदी: द मॅन, द टाइम्स” या पुस्तकामध्ये मोदींच्या गाजेट प्रेमाबद्दल बरीच माहिती देण्यात आली आहे.
-
१९९० च्या दशकामध्ये डिजीटल डायरी वापरणाऱ्या पहिल्या काही लोकांमध्ये मोदींचा समावेश होता.
-
“पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री होण्याआधी मोदींनी मोबाइल फोन कधीच वापरला नव्हता,” असंही या पुस्तकात म्हटलं आहे.
-
निरंजन मुखोपाद्याय यांनी लिहिलेल्या “नरेंद्र मोदी: द मॅन, द टाइम्स” या पुस्तकामध्ये मोदींच्या गाजेट प्रेमाबद्दल बरीच माहिती देण्यात आली आहे.
-
मोदींना अॅपल कंपनीचे प्रोडक्टचे चाहते आहेत.
-
मुख्यमंत्री असताना अनेकदा त्यांच्या हाती दिसणारा आयफोन नजरेत भरायचा.
-
मोदींचे जगभरातील बड्या नेत्यांबरोबरचे सेल्फी काढतानाचे फोटो आहेत.
-
या फोटोंमध्ये मोदी लेटेस्ट आयफोन वापरत असल्याचे दिसून येते.
-
मोदी फोन कोणता वापरतात हे तर स्पष्ट झालं. पण मोदी कोणत्या कंपनीचे सीम कार्ड वापरतात असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
-
तर मोदींनी तीन वर्षांपूर्वी शेअर केलेल्या एका स्क्रीनशॉर्टमध्ये ते व्होडाफोनचे कार्ड वापरत असल्याचे दिसते.
-
दुसऱ्या एका शक्यतेनुसार जगभरातील प्रमुख नेत्यांना सामान्यांप्रमाणे स्मार्टफोन वापरता येत नाही.
-
त्यामुळे मोदी आरएसएक्स (रिस्ट्रीक्टेड एरिया एक्सचेंज) तंत्रज्ञानाच्या मदतीने संरक्षित नेटवर्कच्या माध्यमातून फोनवरुन संवाद साधतात.
-
मोदी अनेक गोष्टी ब्रॅण्डेड वापरत असले तरी ते चप्पल आणि बूट मात्र आपल्या पेहरावाला शोभून दिसणारेच वापरतात.
-
चप्पल आणि बूटांबद्दल त्यांची वेगळी अशी कोणतीच आवड नसल्याचे समजते.
-
पंतप्रधान मोदींबद्दलची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. ही गॅलरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करुन नक्की कळवा.

