-
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७२वा वाढदिवस आहे. देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांपैकी मोदी एक आहेत.
-
जनतेच्या मनातही त्यांची खास प्रतिमा आणि आदर आहे. म्हणूनच मोदींनी सामाजिक हिताच्या दृष्टीने एखादे आवाहन केल्यास त्याला सर्वसामान्यांकडून मोठया प्रमाणावर प्रतिसाद मिळतो. करोना काळातही याची प्रचिती आली आहे.
-
चहावाला ते देशाचे पंतप्रधान असा त्यांचा थक्क करणारा प्रवास सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
-
पंतप्रधान मोदी त्यांच्या स्टाइलसाठीही ओळखले जातात. कपड्यांपासून गॉगलपर्यंत ते अनेक महागड्या गोष्टी वापरतात. यासाठी ते लाखो रुपये खर्च करतात.
-
परंतु, असं असलं तरी त्यांच्याकडे असलेली एकूण संपत्ती ही कित्येक आमदार आणि खासदारांपेक्षाही कमी आहे. आज मोदींच्या वाढदिवशी त्यांच्या संपत्तीवर एक नजर टाकूया.
-
ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांच्या संपत्तीबद्दल माहिती देण्यात आली होती. यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपत्तीत २०२१-२२ वर्षात एकूण २६.१३ लाखांची वाढ झाली आहे.
-
पंतप्रधान कार्यालयाकडून पुरविण्यात आलेल्या माहितीत स्थावर मालमत्तेपुढील कॉलममध्ये मोदींनी NIL असा उल्लेख केला आहे.
-
याचाच अर्थ मोदींच्या नावावर कोणत्याही प्रकारची स्थावर मालमत्तेची नोंद नाही. म्हणजेच ‘पंतप्रधान आवास योजना’ सुरू करणाऱ्या मोदींचं स्वत:चं घर नाही.
-
गुजरातमधील गांधीनगर भागात २०२०-२१ वर्षात मोदींच्या नावावर १४ हजार १२५ चौ किमी बंगल्यातील एक चतुर्थांश भाग होता. बंगल्यातील ३ हजार ५३१ चौ किमी जागेचे मोदी मालक होते.
-
या मालमत्तेतील सुमारे १.१०कोटी इतके बाजारमूल्य असलेले २५ टक्के मालकीचे शेअर पंतप्रधान मोदींनी दान केले आहेत.
-
स्थावर मालमत्तेप्रमाणेच मोदींनी जंगम मालमत्तेतील वाहने या कॉलम पुढेही NILL असा उल्लेख केला आहे.
-
मोदींच्या बॅंक खात्यात फक्त ४६ हजार ५५५ रुपये आहेत. मोदींनी पोस्टमध्ये ९लाख ५ हजार १०५ रुपयांची तर एलआयसीमध्ये १ लाख ८९ हजार ३०५ रुपयांची गुंतवणूक केली आहे.
-
याशिवाय मोदींकडे सोन्याचे दागिनेही आहेत. याची एकूण किंमत १ लाख ७३ हजार रुपये इतकी आहे.
-
मोदी एकूण २ कोटी २३ लाख ८२ हजार ५०४ रुपये मालमत्तेचे मालक आहेत. २०२१-२२ वर्षात मोदींच्या संपत्तीत २६ लाखांची वाढ झाल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली होती. (सर्व फोटो : पंतप्रधान नरेंद्र मोदी/ फेसबुक)

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO