-
Queen Elizabeth II funeral: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना लंडनच्या वेस्टमिन्स्टर अॅबेमध्ये अखेरचा निरोप दिला आहे.
-
या अंत्यविधी कार्यक्रमाला जगभरातील नेत्यांनी हजेरी लावली आहे.
-
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना त्यांचे पती प्रिन्स फिलिप यांच्या समाधीच्या शेजारी दफन करण्यात आलं.
-
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी ब्रिटनवर तब्बल ७० वर्ष राज्य केले.
-
त्यांच्या निधनानंतर त्यांचे मोठे पुत्र चार्ल्स तिसरे हे ब्रिटनचे राजे झाले आहेत.
-
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना आदरांजली वाहण्यासाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अंत्यविधीसाठी लंडनमध्ये उपस्थित होत्या.
-
मूर्मू यांनी ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांची भेट घेत संवेदना व्यक्त केल्या आहेत.
-
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्यासह जगभरातील दिग्गज नेते लंडनमध्ये दाखल झाले.
-
महाराणीच्या अंत्यविधीसाठी ५०० राजघराण्यांचे सदस्य, राष्ट्रांचे प्रमुख आणि सरकारी प्रतिनिधींना आमंत्रण देण्यात आले होतं.
-
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे ८ सप्टेंबरला स्कॉटलँडमध्ये निधन झाले.
-
त्यानंतर त्यांचे पार्थिव लंडनमध्ये आणण्यात आले होते. लंडनच्या वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
-
महाराणीच्या अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी आठ किलोमीटरपर्यंत रांग लावली होती.
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”