-
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सेलिब्रिटी वाघीण अशी ओळख असलेली ‘माया’ जेवढी प्रेमळ तेवढीच आक्रमक.
-
पर्यटकांना ती कधी एकटी, कधी सहकारी वाघांसह तर कधी पिल्लांबरोबर दिसून येते.
-
कित्येकदा तर ती तिच्या पिल्लांबरोबर मायेचे क्षण अनुभवताना दिसून आली आहे आणि म्हणूनच कदाचित तिचे नाव ‘माया’ पडले असावे.
-
ताडोबातील पांढरपौनी म्हणजे ‘माया’ हमखास दिसणार. किंबहूना तिचा अधिवास अशीच पांढरपौनीची ओळख झाली आहे.
-
‘मटकासूर’ या वाघाने तिच्या अधिवासात प्रवेश केला तेव्हा ती कित्येकदा त्याच्यासह दिसून आली. नंतर ‘गब्बर’ नावाचा वाघ तिथे आला आणि ‘मटकासूर’ने तो अधिवास सोडला. त्यानंतर ‘गब्बर’बरोबर ती अनेकदा दिसून आली.
-
नर वाघापासून पिल्लांना असणारा धोका ओळखूनच ती या दोघांबरोबर राहायची, अशीही कथा ताडोबातील पर्यटक मार्गदर्शक ऐकवतात. तिच्या आणि तिच्या पिलांना कित्येकदा एकत्र पाहायला मिळाले आहे आणि त्याच्या छायाचित्रासाठी पर्यटकांनी धडपडही केली आहे.
-
पिल्लांच्या जिवाला तर या माणसांपासून धोका नाही ना, अशी भीती तिला वाटली आणि एकदा तिने पर्यटकांना तिचा आक्रमक पवित्रा दाखवला. तिचे पिल्लांबरोबरचे छायाचित्र टपाल तिकीटावरही झळकले आहे.
-
मागील वर्षी व्याघ्रगणनेसाठी जंगलात गेलेल्या महिला कर्मचाऱ्यावर ‘माया’ने हल्ला चढवला आणि त्यात ती महिला कर्मचारी ठार झाली. हा एक डाग मात्र ‘माया’च्या कपाळी लागला.
-
सर्व छायाचित्रे – शशिकांत देवगडे (हेही पाहा : दाढी असणारा शिरखेडाचा ‘दढियल’ वाघ)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य