-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पसंतीचा वाहन क्रमांक आपल्या वाहनालाही असावा या हेतूनेच या वाहन क्रमांकाला मागणी वाढली आहे.
-
मुख्यमंत्री शिंदे यांच्या पसंतीचा ५६७ हा क्रमांक त्यांच्या वाहनावर अनेक वर्षे असतो.
-
मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावरही ते स्वत:च्या खासगी वाहनातून मुंबई-ठाण्यात प्रवास करतात.
-
मुख्यमंत्री शिंदेंचा हा आवडता क्रमांक आपल्या वाहनावरही असावा, अशी काही जणांची इच्छा असावी.
-
याचे प्रत्यंतर गेल्याच आठवड्यात ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात आले.
-
साधारणपणे चांगल्या (उदा. ४४४४, ९९९९) क्रमांकांसाठी अधिक मागणी असते.
-
तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा २३४५ हा वाहनांसाठी पसंती क्रमांक आहे.
-
यामुळे चेन्नई किंवा विजयवाड्यात या क्रमांकाला अधिक मागणी असते, असेही परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
-
दाक्षिणात्य राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या आवडीचा क्रमांक आपल्या गाडीसाठीही हवा असण्याचा ट्रेण्ड महाराष्ट्रात आणि खास करुन एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात वाढल्याचं दिसत आहे.
-
मुख्यमंत्री शिंदेंच्या पसंती क्रमांक असल्याने त्याला मागणी वाढल्याचा अनुभव परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना आला.
-
वाहनांच्या नव्या सीरिजमध्ये मुख्यमंत्र्याच्या गाडीप्रमाणेच ५६७ क्रमांकाकरिता लिलाव पद्धतीत लेखी अर्ज आले होते.
-
यापूर्वी म्हणजे शिंदे मुख्यमंत्री होण्यापूर्वी ठाण्यात या क्रमांकाला कधीच मागणी नसायची असेही सांगण्यात आले.
-
५६७ क्रमांकाकरिता ३० हजारांपासून ते ७० हजारांपर्यंत लिलावाची रक्कम पुकारली जात होती.
-
शिंदेंच्याच गाडीप्रमाणे ५६८ हा क्रमांक हवा म्हणून सर्वाधिक ७० हजारांची रक्कम देण्याची तयारी दर्शविलेला हा क्रमांक देण्यात आला आहे.
-
शिंदेंचा हा चाहता कोण आहे यासंदर्भातील माहिती मात्र ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली नाही.

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी