-
अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट अस्तित्वात आल्यापासून देशातील अल्पसंख्यांकाचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. (Photo-AP)
-
अफगाणिस्तानात सत्ताबदल घडल्यानंतर अनेक नागरिकांनी भारतात आश्रय घेतला आहे. मात्र, आजही असंख्य नागरिक तालिबानी राजवटीत जगत आहेत. त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. (Photo-AP)
-
दरम्यान, रविवारी ५५ अफगाणी शीख नागरिकांना भारतात आणण्यात आलं आहे. एका विशेष विमानाने त्यांना अफगाणिस्तानातून दिल्ली विमानतळावर आणण्यात आलं आहे.
-
तालिबानी राजवटीत त्रस्त झालेल्या अल्पसंख्यांकांना बाहेर काढण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून भारत सरकारने ५५ जणांना बाहेर काढलं आहे.
-
यावेळी काहीजणांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची व्यथा मांडली आहे.
-
अफगाणी शीख बलजीत सिंग म्हणाले की, अफगाणिस्तानातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. मला चार महिने तुरुंगात डांबून ठेवलं होतं.
-
तालिबान्यांनी आमची फसवणूक केली असून त्यांनी तुरुंगात आमचे केस कापले. मी भारतात आणि माझ्या धर्मात परतल्याबद्दल खूप आनंदी आहे.
-
आम्ही भारत सरकारचे खूप आभारी आहोत. त्यांनी आम्हाला तातडीचा व्हिसा दिला आणि आम्हाला भारतात पोहोचण्यास मदत केली.
-
आमच्यापैकी अनेकांची कुटुंबे अजूनही अफगाणिस्तानात राहिली आहेत. सुमारे ३०-३५ लोकं अजूनही अफगाणिस्तानात अडकले आहेत, अशी प्रतिक्रिया अफगाणी शीख सुखबीर सिंग खालसा यांनी दिली आहे. (सर्व फोटो सौजन्य-एएनआय)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य