-
ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेच्या अंतराने राशी बदलतो ज्यानुसार विविध योग जुळून येत असतात.
-
यंदा ३० वर्षानंतर शनी ग्रहाच्या संक्रमणाने केंद्र त्रिकोण योग जुळून आला आहे. शनी मकर राशीत गोचर करणार असून या राशीच्या व्यक्तींवर ऑक्टोबर महिन्यात याचा प्रभाव जाणवून येईल.
-
शनीच्या संक्रमणाचा सर्वच राशींवर प्रभाव जाणवेल मात्र अशा ३ राशी आहेत, ज्यांच्यासाठी शनीचे संक्रमण लाभदायक ठरू शकते.
-
मेष : मकर राशीतील शनीची परिक्रमा व्यवसायात तुम्हाला चांगले यश मिळून देऊ शकते. कारण व्यवसाय आणि नोकरीचे स्थान मानल्या जाणार्या दशम भावात शनिदेव मार्गस्थ आहेत. त्यामुळे या काळात तुमची प्रतिष्ठा आणि प्रतिष्ठा वाढू शकते.
-
मेष राशीच्या व्यक्तींना यामुळे नोकरीच्या नव्या संधी बढती आणि वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातही चांगला नफा होऊ शकतो.
-
मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ गुंतवणुकीची सुवर्णसंधी ठरू शकतो. अशा लोकांना अनपेक्षित धनप्राप्ती होऊ शकते.
-
मीन: ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीसाठी शनि अकराव्या भावात आहे. ज्याला ज्योतिषशास्त्रात उत्पन्न आणि लाभाचे स्थान मानले जाते.
-
मीन राशीच्या व्यक्तींना या काळात उत्पन्नवाढ लाभू शकते. उत्पन्नाचे नवे स्रोतही निर्माण होतील. तसेच व्यवसायात नवे संपर्क तयार होऊ शकतात.
-
मीन राशीच्या व्यक्तींना संतती सुखाचे संकेत आहेत. तुम्हाला अपत्याकडून सुखद वार्ता मिळू शकते.
-
धनु राशीसाठी ऑक्टोबरपर्यंत शनिदेवाची प्रतिगामी स्थिती लाभदायक ठरू शकते.
-
धनु राशीत शनि ग्रह तुमच्या दुसऱ्या स्थानी आहे. ज्याला ज्योतिषशास्त्रात धन आणि वाणीचे स्थान मानले जाते. या काळात तुम्हाला शेअर बाजारात नफा मिळण्याची शक्यता आहे.
-
धनु राशीचे व्यक्ती जे राजकारणात सक्रिय आहेत किंवा त्यांचे काम भाषणाशी संबंधित आहे त्यांना फायदा होऊ शकतो.
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…