-
देशभरातील कोणत्याही व्याघ्रप्रकल्पात वाघ किंवा वाघिणीला नसतील इतकी नावे ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात आहेत. किंबहूना त्यांच्या अधिकृत नावांऐवजी पर्यटकांनी दिलेल्या नावांनीच ती ओळखली जातात.
-
त्यापैकीच एक म्हणजे शांत आणि संयमी ‘डब्ल्यू’ ही वाघीण.
-
तिच्या कपाळावर ‘डब्ल्यू’ अशी खूण आहे आणि म्हणूनच ती त्याच नावाने ओळखली जाते.
-
२०१४-१५ मध्ये तिचा जन्म झाला. ‘लारा’ ही वाघीण आणि ‘बजरंग’ या वाघाची हे अपत्य.
-
तिच्याआधी ‘लारा’ या वाघिणीला ‘कॉलरवाली’ हे अपत्य होते.
-
‘डब्ल्यू’ या वाघिणीला ‘खली’ या वाघापासून एक नर व एक मादी बछडे जन्माला आले.
-
तर दुसऱ्यांदा तिला ‘तारू’ या वाघापासून दोन नर बछडे जन्माला आले.
-
आडेगाव परिसरात तिचा जास्तीत जास्त वावर असायचा. आता तिचा अधिवास आगरझरीकडे वळला आहे.
-
दुसऱ्यांदा झालेल्या तिच्या दोन्ही बछड्यांसह ती पर्यटकांना दर्शन देते.
-
अतिशय शांत व संयमी असणाऱ्या ‘डब्ल्यू’ या वाघिणीने दरम्यानच्या काळात एकदा एका वनरक्षकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यानंतर कधी असे झाले नाही.
-
२०२२ या वर्षात तिने दुसऱ्यांदा दोन अपत्यांना जन्म दिला आणि आता पावसाळा असूनही ती या दोन्ही बछड्यांसह पर्यटकांना दर्शन देते.
-
सर्व छायाचित्रे – अमित सोनटक्के (हेही पाहा : सेलिब्रिटी वाघीण अशी ओळख असलेली ‘माया’)
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य