-
टाईम्स मॅगझीन जगातील प्रभावशाली व्यक्तींची यादी तयार करते. याला ‘Time100 Next’ यादी म्हणतात.
-
टाइम मॅगझिनच्या या यादीत भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आणि रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांना स्थान मिळाले आहे. या यादीत ते एकमेव भारतीय आहेत.
-
ज्या श्रेणी अंतर्गत आकाश अंबानी यांना टाईम १०० नेक्स्ट लिस्टमध्ये स्थान मिळाले आहे, तीही विशेष आहे. रिलायन्स जिओ ग्रुपचे चेअरमन आकाश अंबानी यांची ‘टाइम१०० नेक्स्ट’च्या या यादीत ‘लीडर्स’ श्रेणीमध्ये निवड झाली आहे.
-
याबाबत टाईम मॅगझीनने सांगितलं की, आकाश अंबानी व्यवसाय वाढवण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत. (Express Photo)
-
टाइम मॅगझिनने म्हटले आहे की, आकाश अंबानी यांनी गुगल आणि फेसबुकसोबत अब्जावधी डॉलरच्या गुंतवणुकीचे सौदे पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
-
वयाच्या २२ व्या वर्षी आकाश अंबानी यांना जिओच्या बोर्डात स्थान मिळाले आणि त्याच वर्षी जूनमध्ये त्यांना भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओची कमान देण्यात आली.
-
४२ कोटी ६० लाख ग्राहक असलेल्या रिलायन्स जिओला सांभाळण्याची जबाबदारी आता जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांच्या खांद्यावर आली आहे.
-
टाईम मॅगझिन दरवर्षी ‘टाइम१०० नेक्स्ट’ची यादी प्रकाशित करते. या यादीत उद्योग जगतातील १०० नवोदित उद्योजकांना स्थान देण्यात येते.
-
यंदाच्या ‘टाइम१०० नेक्स्ट’ यादीमध्ये संगीतकारांसह, व्यावसायिक डॉक्टर, सरकारी अधिकारी, आंदोलक, आणि शीर्ष सीईओ यांचाही समावेश करण्यात आला आहे. (Photos : Instagram – @Shloka_Akash_Ambani)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…