-
नवी दिल्ली, अहमदाबाद आणि मुंबई या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या भारतीय रेल्वेच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. पुनर्विकास प्रकल्पात सुमारे १०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे.
-
देशातील प्रमुख रेल्वे स्थानकांचे रूप पालटणार आहे. आता ही रेल्वे स्थानके विमानतळासारखी आलिशान दिसणार आहेत.
-
सीएसएमटीच्या हेरिटेज इमारतीत काही बदल केले जाणार नाहीत, पण आजूबाजूच्या इमारतींचा पुनर्विकास केला जाईल, असे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरच्या चर्चेत सांगितले.
-
अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवर यासंबंधीचे फोटो शेअर केले आहेत. नवी दिल्ली, अहमदाबाद आणि सीएसएमटी मुंबई रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाला मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.
-
नवी दिल्ली, अहमदाबाद आणि सीएसएमटी, मुंबईचा पुनर्विकास सुमारे २ ते ३.५ वर्षांमध्ये केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
-
या स्थानकांच्या विकासामुळे ३५,७४४ नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. यासोबतच गुंतवणूक आणि इतर व्यवसायाच्या संधींद्वारे स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईल.
-
पहिल्या टप्प्यात १९९ स्थानकांचा प्रतिदिन ५० लाखांचा पुनर्विकास करण्याची योजना आहे. ४७ स्थानकांसाठी निविदा काढल्या आहेत, ३२ स्थानकांवर काम सुरू आहे, साडेतीन वर्षांत नवी दिल्ली स्थानकाचा पुनर्विकास पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
-
रेल्वेमंत्र्यांनी ट्विटरवर काही डिझाइन्स शेअर केल्या आहेत, ज्यामध्ये रिटेल, कॅफेटेरिया आणि मनोरंजनाच्या सुविधा लक्षात ठेवल्याचं स्पष्टपणे दिसतंय.
-
या प्रकल्पात प्रवाशांच्या सर्व सुविधांचा विचार केला जाईल. आता जर तुमची ट्रेन यायला वेळ लागला किंवा तुम्ही स्टेशनवर लवकर पोहोचला असाल तर तुमच्यासाठी इथे वेळ घालवणे सोयीचे होईल.
-
या अंतर्गत या स्थानकांवर छतावरील प्लाझा बांधण्यात येणार आहेत. फूड कोर्ट आणि लहान मुलांसाठी खेळण्याची जागा देखील आहे. तसेच स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली जाईल.
-
रेल्वे वाहतूक सेवा सुधारण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
-
प्रत्येक सुविधा प्रवाशांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने रेल्वेच्या विकासासाठी काम केले जात आहे. (All Photos : Twitter/ AshwiniVaishnaw)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल