-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे नेहमीच आपल्या थेट वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. तसेच, त्या अनेक ठिकाणी भेट देतात आणि जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात.
-
नुकतंच सुप्रिया सुळे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंत नागदे यांच्या निवास्थानी भेट दिली.
-
यावेळी त्यांना वसंत नागदे यांचा अतिशय अभिनव पैलू पाहायला मिळाला.
-
ही गोष्ट त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेयर करत वसंत नागदे यांचं कौतुक केलं आहे.
-
काल म्हणजेच २९ सप्टेंबरला खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ आणि काही फोटो पोस्ट केले आहेत.
-
तसेच या घटनेची संपूर्ण माहिती त्यांनी आपल्या कॅप्शनमध्ये दिली आहे.
-
त्यांनी कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंत नागदे यांच्या मुलाचं नुकतंच निधन झालं आहे.
-
मात्र अशा परिस्थितीतही ते आपल्या सुनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांनी आपल्या सुनेच्या हस्ते सुप्रिया सुळे यांचं स्वागत केलं.
-
यावेळी सुनबाई पाहुण्यांना कुंकू लावताना बिचकत होत्या. मात्र वसंतरावांनी लगेचच आपल्या सुनेला आधार देत प्रोत्साहन दिले.
-
दरम्यान, हा संपूर्ण प्रसंग अतिशय भावनिक आणि अंगावर शहारे आणणारा होता.
-
खासदार सुप्रिया सुळे नेहमीच स्त्री सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असतात.
-
त्यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून वसंत नागदे यांचं कौतुक केलं आहे.
-
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, “हा सगळा प्रसंग अतिशय भावूक करणारा, नवी दिशा देणारा आणि आश्वासक असा होता.”
-
नेटकऱ्यांनीही वसंत नागदे यांचे कौतुक केले असून ते सुप्रिया सुळे यांच्या फोटोवर अनेक प्रतिक्रिया देत आहेत.
-
सर्व फोटो : सुप्रिया सुळे – फेसबुक

Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश