-
Viral Photo Of The Week: महसा अमिनीच्या मृत्यूच्या निषेधार्थ गेल्या दोन आठवड्यांपासून हजारो इराणी रस्त्यावर उतरले आहेत. या फोटोमध्ये तेहरानच्या मध्यभागी झालेल्या निषेधादरम्यान पोलिसांची मोटारसायकल जळताना दिसत आहे.
-
Viral Photo Of The Week:शनिवारी, 1 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील १३ शहरांमध्ये 5G सेवा लाँच करण्यात आल्या. देशवासियांना वेगवान नेटवर्कने जोडून ठेवण्यासाठी हे मोठे पाऊल मानले जात आहे.
-
Viral Photo Of The Week:देशभरात नवरात्रीचा जलोष पाहायला मिळाला यामध्ये बंगळुरूच्या विमानतळावर प्रवाशांनी गरब्याचा ताल धरला होता.
-
Viral Photo Of The Week: क्युबाची राजधानी हवाना येथील रहिवासी इयान चक्रीवादळामुळे ४ दिवसांपासून वीज खंडित झाल्यानंतर निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते
-
Viral Photo Of The Week: या फोटोत बाल्टिक समुद्रातील स्वीडिश क्षेत्रामध्ये नॉर्ड स्ट्रीम 1 मधून गॅस गळती होताना दिसत आहे. या आठवड्यात युरोपच्या नॉर्ड स्ट्रीम पाइपलाइनमध्ये गळती झाली होती, यामुळे समुद्री जीवांना मोठा धोका निर्माण झाला आहे. (रॉयटर्स/स्वीडिश कोस्ट गार्ड)
-
Viral Photo Of The Week:जनरल अनिल चौहान यांनी भारताचे नवे चीफ ऑफ डिफेन्स (CDS) म्हणून पदभार स्वीकारला. “मी तिन्ही संरक्षण दलांकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन,” असे चौहान यांनी पदभार स्वीकारताना सांगितले. (एक्सप्रेस फोटो प्रेमनाथ पांडे)
-
Viral Photo Of The Week:ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री आशा पारेख यांना ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. “आशा पारेख यांच्या पिढीतील महिलांनी बंधने झुगारून स्वत:चे एक स्थान निर्माण केले आहे. नारी शक्तीसाठी हा सन्मान आहे,” असे मुर्मू यावेळी म्हणाल्या. (एक्सप्रेस फोटो प्रवीण खन्ना)
-
Viral Photo Of The Week: कोलकातामध्ये दुर्गा पूजेला सुरुवात झाली असून परंपरेनुसार, कुटुंबातील नव वधू देवीला दागिन्यांनी सजवतात. (एक्स्प्रेस फोटो शशी घोष)
-
Viral Photo Of The Week: युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल फ्लोरिडा येथील विद्यार्थी इयान चक्रीवादळ व पावसानंतर कॅम्पसजवळील घरे रिकामी करताना दिसत आहेत. यामध्ये गाद्यांवर बसून विद्यार्थ्यांना जीव वाचावा लागतोय. (एपी)

Indus Waters Treaty suspension: “पाकिस्तानला हे परवडणारं नाही”; पाकिस्तानातील तज्ज्ञ सांगताहेत, असे का?