-
‘छोटी तारा’ नावाप्रमाणेच तारका… मग तिचे बछडेही तारकांप्रमाणे नसणार तर काय!
-
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाची शान असणारी ही वाघीण कायम तिच्या बछड्यांसह पर्यटकांना अगदी सहज दर्शन देते.
-
तिच्या बछड्यांबरोबरच तिच्याही अदा पर्यटकांना खिळवून ठेवतात.
-
या ‘छोटी तारा’चा एक किस्सा अजूनही पर्यटकांच्या तोंडी आहे.
-
तो म्हणजे अस्वलाबरोबर तिची होता होता राहिलेली लढाई.
-
‘छोटी तारा’ जिथे बसली होती, त्याच वाटेवरुन अस्वल जात होते.
-
एका क्षणाला दोघेही समोरासमोर आले. तिने शेपटी हलवली आणि अस्वलावर हल्ला करण्याच्या तयारीत ती आली, पण.. अचानक अस्वल दोन्ही पायावर उभे राहिले.
-
‘छोटी तारा’ थोडी घाबरली. त्या दोघांचीही समोरासमोर असलेली आक्रमणाच्या तयारीतील छबी अनेकांनी त्यांच्या कॅमेऱ्यात टिपली.
-
थोडावेळ दोघेही तसेच उभे राहिले आणि मग काय झाले कुणास ठाऊक!
-
त्या अस्वलानेही रस्ता बदलला आणि ‘छोटी तारा’देखील आपल्या वाटेने निघून गेली.
-
हा अलीकडच्या काही महिन्यातीलच किस्सा. येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला पर्यटक मार्गदर्शक तो सांगतो आणि मग ‘छोटी तारा’ आणि तिच्या बछड्याला पाहण्याची उत्सुकता अधिकच ताणली जाते.
-
छायाचित्रे – धनंजय खेडकर, सुरभी जयस्वाल

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य