-
रिलायन्स जिओचे अध्यक्ष मुकेश बई हे अलीकडेच राजस्थान मधील राजसमंद जिल्ह्यात स्थित श्रीनाथजी मंदिरात दर्शनासाठी गेले होते.
-
मुकेश अंबानी हे होणाऱ्या सुनबाई राधिका मर्चंट हिच्यासोबत भगवान श्रीनाथजी यांच्या दर्शनाला पोहोचले होते. या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
या फोटोमध्ये मुकेश अंबानी यांच्यासह मंदिराचे महंत बोलताना दिसत आहेत, विशेष म्हणजे या फोटोत अंबानी चक्क हात जोडून उभे आहेत.
-
अंबानींनी हात जोडल्याने हे महंत नक्की कोण आहेत याबाबत अनेकांना प्रश्न पडू लागला. प्राप्त माहितीनुसार महंतांचे नाव गोस्वामी भूपेश कुमार असे आहे.
-
गोस्वामी भूपेश कुमार यांना बाबा विशाल या नावानेही ओळखले जाते.
-
विशाल बाबा हे श्रीनाथ मंदिराचे महंत व तिलकायत महाराजांचे सुपुत्र आहेत.
-
या फोटोमध्ये आपण पाहू शकता राजस्थानच्या राजघराण्यातील राजकुमारी दिया या विशाल बाबांचा आशीर्वाद घेत आहेत. (Photo: Diya Kumari twitter)
-
वल्लभ सांप्रदायातील भक्तिपीठ श्रीनाथ मंदिर हे अत्यंत प्रसिद्धआहे . राजस्थान मधील अनेक राजघराण्यातील इथे दर्शनासाठी येत असतात.
-
श्रीनाथजी मंदिर हे श्रीकृष्णाचे एकमेव असे मंदिर आहे जिथे कृष्णजन्माष्टमीला २१ तोफांची सलामी दिली जाते.

“आमची मान शरमेने खाली…”, तनिशा भिसेंच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मोठा निर्णय; यापुढे डिपॉझिट…