-
चहा…हे नाव जरी घेतलं तरी आपोआप अंगात तरतरी येते.
-
चहा म्हणजे अनेकांचं पहिलं प्रेम, मित्रांच्या गप्पांमधील साथीदार, चिंब पावसात भिजल्यावर उबदारपणा देणारा सोबती असं चहाचं करावं तेवढं वर्णन कमी आहे.
-
जगाच्या पाठीवर चहाप्रेमी म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर Tea lover असंख्य आहेत. काही जण असेही आहेत, जे दिवसातून ७-८ वेळा सहज चहा पिऊ शकतात.
-
चहाला इंग्रजीमधून ‘टी’ असंच का म्हणतात? असा प्रश्न तुम्हाला कधी तरी पडला असेलच. यामागचं कारण तुम्हाला माहितेय का? यामागची रंजक कहाणी चहा इतकीच तरतरी आणणारी आहे.
-
खरं तर गेल्या कित्येक काळापासून चहा हे ब्रिटिशांचं पेय असल्याचं म्हटलं जातं. मात्र, प्रत्यक्षात तसं अजिबात नाही.
-
ख्रिस्तपूर्व ३० वं शतक ते ख्रिस्तपूर्व २१ वं शतक या काळात चीनमध्ये चहाचा शोध लागला. (Photo: Youtube/ About Our Time)
-
ख्रिस्तपूर्व २७३७ मध्ये शेन नुंग या तत्कालीन सम्राटाचा सत्तेवरुन पाय उतार करण्यात आला होता. त्याला दक्षिण चीनच्या दुर्गम भागात एकांतवासात ठेवलं होतं. तो अतिशय कफल्लक अवस्थेत होता.
-
एकदा तो एका झाडाखाली बसून गरम पाणी पीत असताना त्याच्या कपातील गरम पाण्यात त्या झाडाची काही पानं पडली. त्यामुळे पाण्याचा रंग बदलला, चवही बदलली.
-
सम्राटाला त्या पाण्यामुळे एकदम तरतरी आली. त्याला ती चवही इतकी आवडली की त्या काळात त्याने गरम पाण्यात ती पाने घालून ते पाणी प्यायचा सपाटाच लावला.
-
त्याने त्या परिसरात म्हणजे सिचुआन आणि युनानच्या डोंगररांगांच्या त्या परिसरात चहाच्या रोपांचा शोध घेतला. सातत्याने चहा प्यायल्याने त्याचा पोटदुखीचा आजार बरा झाला असा प्रचार करत तो देशभर फिरू लागला.
-
त्यातून आजच्या चहाचा जन्म झाला असं मानलं जातं. नंतर चीनमधून चहाची लोकप्रियता जगभर पसरत गेली. या वेळी राजाने त्याचे नाव ‘चा’, या चिनी अक्षराचा अर्थ ‘शोध’ असा होतो. (Photo: Youtube/ About Our Time)
-
प्रसिद्ध पेय होण्यासाठी अनेक वर्षे लागली: सुरुवातीच्या काळात पाने खुडून पाण्यात उकळून कडू काढा तयार केला जात असे. चहाच्या पानांचा वापर प्रामुख्याने औषध म्हणून आणि दुसरे म्हणजे आरामदायी पेय म्हणून केला जात असे. संपूर्ण चिनी साम्राज्यात चहाला लोकप्रिय पेय बनण्यासाठी ३००० वर्षांहून अधिक काळ लागला.
-
चहाला चहा का म्हणतात? – चहाची मागणी वाढल्यानंतर देश-विदेशात त्याचा पुरवठा झपाट्याने वाढला होता. त्यानंतर या चहाला सगळीकडे वेगवेगळी नावे मिळाली. रिपोर्ट्सनुसार, जिथे चहा जमिनीतून पोहोचला, त्याला ‘चाय’ असे म्हणतात आणि जिथे पाण्याच्या माध्यमातून वाहून नेले जाते, त्याला ‘चहा’ असे नाव देण्यात आले. पण नंतर शब्दकोशात चहाचा अर्थ सांगितला गेला. (Photo: Youtube/ About Our Time)
-
चीनच्या ज्या भागातून चहा आयात केला गेला आहे, त्यावरून त्याला ओळखण्यासाठी ‘टी’ असं नाव पडलं. डचांशी प्रामुख्याने व्यवहार करणाऱ्या ‘फ्यूजियान’ प्रांतातून आला असेल तर ‘ते’ किंवा ‘टी’ म्हणतात. त्याचंच यूरोपात ‘टी’ या तत्सम नावात रूपांतर झालं. (Photo: Youtube/ About Our Time)
-
१९ व्या शतकात चहा पिणे हा ब्रिटिशांच्या सामाजिक जीवनाचा एक भाग बनला. कौटुंबिक चहा, पिकनिक चहा, टेनिस चहा आणि दुपारचा मोहक चहा यासह सर्व संभाव्य प्रसंगी चहा पार्टी आणि कार्यक्रम आयोजित केले गेले. चहा पार्टी लालित्य आणि समृद्धीचे प्रतीक होते.

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल